ETV Bharat / state

भारत नगर गॅस दुर्घटना : चौघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

नाशिक येथील मुंबई नाका परिसरातील भारतनगर येथे मंगळवारी झालेल्या गॅस दुर्घटनेतील चौघांचा उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. 4 डिसेंबर) मृत्यू झाला आहे.

author img

By

Published : Dec 5, 2020, 9:45 PM IST

दुर्घटना
दुर्घटना

नाशिक - मुंंबई नाका परिसरातील भारतनगर येथे मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) अचानकपणे व्यावसायीक गॅसचा घरगुती वापर करत असताना गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत घरात राहणारे सहा जण भाजले होते. त्यापैकी चौघांचा शुक्रवारी (दि. 4 डिसेंबर) उपचारादरम्यान मृत्यू झाला असून उर्वरित दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. या घटनेने भारतनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते

जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेत सहा जण भाजले होते. रशीद लतिक अन्सारी (वय 30 वर्षे), मोहम्मद अमजद अब्दूल रौफ अन्सारी (वय 30), मोहम्मद मुर्तजा अन्सारी (वय 30 वर्षे) व मोहम्मद अफताफ आलम (वय 19 वर्षे, रा. सर्व रूम नं.4 भारतनगर) अशी मृतांची नावे आहेत. भारतनगर येथे मंगळवारी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. परिसरातील नागरीक आणि पोलिसांनी जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तब्बल चार दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरीत दोघांवर उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरमालकासह भाडेकरू गुन्हा दाखल

याप्रकरणी दोन दिवसांपूर्वीच मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरमालकासह भाडेकरु असलेल्या जखमी आणि मृतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात अनधिकृतपणे व्यावसायीक गॅसचा घरगुती वापर करत होते. तसेच गॅसच्या नळीला तडा गेल्याचे माहित असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन स्वतःच्या आणि परिसरातील नागरिकांच्या घरांना आग लागून त्यांच्या जीवितास व मालमत्तेचे धोका निर्माण केल्याच्या आरोप करण्यात आला आहे. या गुह्यात भाडेकरुंची माहिती लपवल्याप्रकरणी घरमालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी बाजार समिती संचालकांनी दिला आंदोलनाचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.