नाशिक - नांदगाव तालुक्यातील वसंतनगर येथे ४० नागरिकांना अचानक उलटी व जुलाबचा त्रास होण्यास सुरुवात झाली आहे. त्यांना उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पाण्यातून किंवा अन्नातून विषबाधा झाली असल्याचा मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी चौकशी केली असता त्रास होणाऱ्या सर्वांनी तरबूज खाल्ले असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच अचानक झालेल्या वादळामुळे वसंतनगर येथील विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे तेथे टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे तेथील नागरिक विहीरीतील पाणी पित होते. त्रास होणाऱ्या नागरिकांना पाण्यातून किंवा अन्नातून विषबाधा झाली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी सांगितले.
उलटी आणि जुलाबाचा त्रास होणाऱ्या नागरिकांची नावे
भागिनाथ चव्हाण (वय, 50) कविताबाई चव्हाण (वय, 30) अश्विनी चव्हाण (वय, 16), रितेश चव्हाण (वय, 8), लताबाई चव्हाण, जगदीश चव्हाण, अरविंद चव्हाण, प्रवीण चव्हाण, अंकुश चव्हाण, लिलाबाई चव्हाण, गोरख चव्हाण, नर्मदा बाई चव्हाण, गंगुबाई चव्हाण, समीर राठोड, पार्वतीबाई चव्हाण, रोशन राठोड, पूजा राठोड, शांताबाई चव्हाण, शंकर चव्हाण, समाधान चव्हाण, सुरेखा राठोड, सुनील राठोड, करिष्मा राठोड, सुरेश चव्हाण, सुमित चव्हाण, पर्वती चव्हाण, सुमनबाई चव्हाण, रवींद्र चव्हाण उज्वला राठोड यासह आणखी काही नागरिकांना शुक्रवारी दुपारपासूनच अचानक ऊलटी व जुलाबचा त्रास सुरू झाला आहे. मात्र, संध्याकाळी त्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.