ETV Bharat / state

नाशिकमध्ये माजी नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू - Nashik

कोरोनाबाधित माजी नगरसेवकाची प्रकृती स्थिर होती. मात्र, हळूहळू प्रकृती खालावत गेली. आज दुपारी त्यांचे दुःखद निधन झाले आहे. यामुळे संपूर्ण नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jun 13, 2020, 8:49 PM IST

नाशिक - महानगरपालिकेचे लोकप्रिय माजी नगरसेवकाचा आज करोनामुळे मृत्यू झाला आहे. ते 62 वर्षाचे होते. ते कॅन्सरबाधितही असल्याने काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर केमो थेरपी झाली होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून ते रुग्णालयात दाखल होते.

कोरोनाबाधित माजी नगरसेवकाची प्रकृती स्थिर होती. मात्र, हळूहळू प्रकृती खालावत गेली. आज दुपारी त्यांचे दुःखद निधन झाले आहे. यामुळे संपूर्ण नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

महापालिकेची स्थापना झाल्यानंतर 1992 च्या निवडणुकीत ते अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. या काळात त्यांची विधी समितीच्या अध्यक्षपदीही निवड झाली होती. त्यानंतर 1997 ला ते पुन्हा निवडून आले. या काळात त्यांनी जुने नाशिक परिसरातील समस्यांवर सातत्याने प्रकाशझोत टाकला.

2007 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली. तत्कालीन आमदार वसंत गीते यांचे ते निकटवर्तीय मानले जात. या 5 वर्षाच्या कार्यकाळानंतर मात्र ते राजकारणात सक्रिय नव्हते. गंगापूर रोड परिसरातील खतीब डेअरीचे ते संचालक होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.