ETV Bharat / state

नांदगांव येथील एकाच कुटुंबातील सहा जणांना अन्नातून विषबाधा

टाकळी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील ६ सदस्यांनी कोथिंबीर घातलेल्या भाकरी खाल्ल्या होत्या. त्यानंतर, त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास व्हायला लागला. हा त्रास वाढत असल्याचे लक्षात येताच त्यांना रुग्णवाहिकेतून नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

nashik
एकाच कुटुंबातील सहा जणांना अन्नातून विषबाधा
author img

By

Published : Dec 16, 2019, 12:24 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील टाकळी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील ६ जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. या सहाही जणांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रोहीयाबाई सोर (वय ६०), गंगाराम शिवतडे (वय १०), वसंत सुळ(वय ९), गोटूराम सुळ (वय ११ ), सागर सुळ (वय ४ ), लंका आयनोर (वय ८) असे विषबाधा झालेल्या या ६ जणांची नावे आहेत.

माहितीनुसार, टाकळी बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील ६ सदस्यांनी कोथिंबीर घातलेल्या भाकरी खाल्ल्या होत्या. त्यानंतर, त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास व्हायला लागला. हा त्रास वाढत असल्याचे लक्षात येताच त्यांना रुग्णवाहिकेतून नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळीच उपचार करण्यात आल्याने त्यांचा जीव वाचला. सध्या या सहाही जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पालेभाज्यावर फवारण्यात येणाऱ्या कीटकनाशकामुळे ही विषबाधा झाल्याची शक्यता डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

आपण बाजारातून आणलेल्या पालेभाज्या स्वच्छ धुवून मगच त्यांचा वापर करावा, असा सल्लाही यावेळी डॉक्टरांनी दिला.

हेही वाचा - मैत्रिणीने बोलावले असल्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

हेही वाचा - नाशिकमध्ये 'सोलार ट्री'च्या माध्यमातून ऊर्जा संवर्धनाचा संदेश

Intro:नांदगाव: टाकळी बुद्रुक ( ता.नांदगाव ) येथील एकाच कुटुंबातील सहा जणांना अन्नातून विषबाधा झाल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या सहाही जणांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या डॉक्टरानी दिली आहेBody:नांदगांव तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथील रोहीयाबाई सोर ( वय - ६० ), गंगाराम शिवतडे (वय - १०), वसंत सुळ (वय - ९ ), गोटूराम  सुळ (वय - ११ ), सागर सुळ (वय - ४ ), लंका आयनोर (वय - ८) या एकाच कुटुंबातील सदस्यांनी कोथिंबीर घातलेल्या भाकरी खाल्ल्या होत्या. त्यानंतर काही वेळाने या सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास व्हायला लागला.कुटुंबातील सदस्यांना हा विषबाधेचा प्रकार असल्याचे लक्षात आल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.ख्याती तुसे व त्यांच्या वैद्यकीय पथकाने या रुग्णांवर उपचार केले. सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याचं डॉक्टराणी सांगितले आहे.Conclusion:वेळीच उपचार मिळाले नसते तर त्यांच्या जीवावर बेतले असते तसेच लहान मुलं देखील असल्याने चिंतेचे वातावरण होते.मात्र गावकरी व कुटुंबाने वेळीच उपचार करुन सर्वांचे प्राण वाचवले आहे.आपण बाजारातुन आणलेला भाजीपाला चांगला स्वच्छ धूवुन खावा असा सल्ला डॉक्टराणी दिला आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.