लासलगाव (नाशिक) - बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा लासलगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिला डॉक्टरसह पाच जणांना अटक केली असून आरोपींकडून 500 च्या 291 बनावट नोटा करण्यात जप्त करण्यात आल्या आहेत. प्रतिभा बाबुराव घायाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिला डॉक्टरचे नाव आहे. या घटनेने लासलगावात खळबळ उडाली आहे.
लासलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारवाईत 500 च्या बनावट 1 लाख 45 हजार रुपये मुल्याच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटासंबंधी पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती, की लासलगाव येथील राहणारे मोहन बाबुराव पाटील व डाॅ. प्रतिभा बाबुराव घायाळ दोघांना दोन आरोपी बनावट नोटांचा चलनात वापर करण्यासाठी पुरवठा करणार आहेत. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी रवींद्र हिरामण राऊत (राहणार पेठ ) व विनोद मोहनभाई पटेल (राहणार पंचवटी) यांची नावे समोर आली.
या प्राप्त माहितीनंतर या कारवाईत पोलिसांनी 5 जणांवर भादवि कलम 489 क . ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पोउनि रामकृष्ण सोनवणे हे करीत आहे .
हेही वाचा -Cruise Drug Case : आर्यनला 'जेल की बेल'?; आज न्यायालय देणार निकाल