ETV Bharat / state

नाशिक महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महासभेला सुरुवात - नाशिक मनपा न्यूज

ऑनलाईन महासभेला महापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते. सलग तीन महिन्यांत महासभा घेतली नाही तर सत्ताधारी पक्ष नियमानुसार अडचणीत येतो.

नाशिक महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महासभेला सुरुवात
author img

By

Published : May 29, 2020, 5:38 PM IST

नाशिक - महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महासभेला सुरुवात झाली. या ऑनलाईन महासभेला महापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते. सलग तीन महिन्यांत महासभा घेतली नाही तर सत्ताधारी पक्ष नियमानुसार अडचणीत येतो.

कोरोनाच्या काळात सुचनांमुळे महासभा घेण्यावर बंधने आली होती. आपत्कालीन व्यवस्थापन कायदा आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे महासभा घेण्यावरुन अनेक दिवसांपासून खल सुरू होता. त्यावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात राजकारण सुरू झालं होतं. मात्र, त्यावर तोडगा काढत व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगवर म्हसभेला सुरुवात झाली. नगरसेवकांना विशिष्ट अ‍ॅपवर आयडी आणि पासवर्ड देण्यात आला आहे. महापालिकेच्या इतिहासात हा प्रयोग पहिल्यांदाच असल्याने कितपत यशस्वी होतो? हे बघणे महत्त्वाचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.