ETV Bharat / state

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी; मालेगावात एकाच दिवशी पाच पॉझिटिव्ह तर, एकाचा मृत्यू - दिल्ली मरकझ

नाशिकमध्ये आजवर दोनच कोरोनाबाधित रुग्ण होते. मात्र, आता मालेगावमधील या पाच जणांचे अहवाल 'पॉझिटिव्ह' आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दोनवरून थेट सातवर गेला आहे. कोरोना बाधितांचा आकडा अचानक वाढल्याने जिल्ह्यातील कोरेानाचे संकट अधिक गडद झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी
author img

By

Published : Apr 9, 2020, 8:11 AM IST

Updated : Apr 9, 2020, 11:28 AM IST

नाशिक - जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने नाशिकमध्ये पहिला बळी घेतला आहे. नाशिकच्या मालेगावमधील एका 51 वर्षीय व्यक्तीचा बुधवारी सकाळी कोरोना सदृश्य आजाराने मृत्यू झाला होता. यानंतर प्रशासनाने या मृत व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. रात्री उशिरा या मृत व्यक्तीच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. इतकेच नाही तर, या मृत व्यक्तीबरोबर आणखी पाच नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

कालपर्यंत जिल्ह्यात अवघ्या दोन पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांची नोंद होती. मात्र, आता मालेगावमधील पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधांचा आकडा सातवर गेला आहे. या पाचही जणांवर मालेगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दरम्यान नाशिकमधील कोरोना बाधितांचा आकडा अचानक वाढल्याने सरकारी यंत्रणादेखील धास्तावल्या आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असले तरी नागरिकांनी पुढील काळात सरकारी यंत्रणांना अधिक सहकार्य करणे गरजेचे आहे. मालेगावमधील नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क करण्यासाठी पावलं उचलली आहे.

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात नाशिकमध्ये आजवर दोनच कोरोना बाधित रुग्ण होते. मात्र, आता मालेगावमधील या पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दोनवरुन थेट सातवर गेला आहे. कोरोना बाधितांचा आकडा अचानक वाढल्याने जिल्ह्यातील कोरेानाचं संकट अधिक गडद झाल आहे. गांभीर्याची बाब म्हणजे जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेल्याचेही प्राप्त झालेल्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे एका दिवसात एकाचा बळी आणि पाच जणांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट यामुळे शासकीय यंत्रणानाही धक्का बसला आहे.

मालेगावमधील या सर्व कोरोना बाधितांची दिल्ली प्रवासाची 'हिस्ट्री' असल्याने प्रशासनाने आता दिल्ली प्रवासातील नागरिकांबाबत कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. तसेच नागरिकांनीदेखील जिल्हा प्रशासनाला पुढील काळात सहकार्य करणं गरजेचे आहे.

Last Updated : Apr 9, 2020, 11:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.