ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये १० नोव्हेंबरपासून फटाके वाजवण्यास बंदी - Collector Suraj Mandhare order

वायू प्रदूषणामुळे कोरोनाच्या संसर्गात वाढ होऊ नये, यासाठी दिवाळीत कंटेन्मेंट झोन, शांतता क्षेत्र आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Nov 8, 2020, 4:11 PM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत कंटेन्मेंट झोन, शांतता क्षेत्र आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढला आहे. १० नोव्हेंबरला मध्यरात्री १२ पासून ते पुढील आदेशापर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.

माहिती देताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसून येत आहे. मात्र, वायू प्रदूषणामुळे जिल्ह्यात नियंत्रित होत असलेल्या कोरोनाच्या संसर्गात वाढ होऊ नये यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यानी सागितले.

कोरोना संदर्भात राज्यस्तरीय आढावा सभेमध्ये तज्ञ व्यक्तींनी आगामी काळात कोरोना संसर्गाची संभाव्य वाढ, तसेच वायू प्रदूषणाचा होणारा परिणाम, याबाबत उचित दक्षता घेण्याबाबत सूचित केले आहे. या सूचनेला अनुसरून खबरदारी म्हणून हा आदेश काढण्यात आला आहे.

हेही वाचा- नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीत टवाळ युवकांनी जाळली कामगाराची दुचाकी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.