ETV Bharat / state

नाशिक : नामांकित कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक

author img

By

Published : Jan 3, 2020, 5:27 PM IST

तरुण नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. याच अपरिहार्यतेचा गैरफायदा घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. परदेशात किंवा नामांकित कंपनीत नोकरी मिळाल्याचे या तरुणांना भासवले जाते. नंतर, कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कारण देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. भूषण काटे या तरुणाने दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला.

nashik
प्रातिनिधीक छायाचित्र

नाशिक - शहरातील काही तरुणांना जॉब पोर्टलवर आपला बायोडेटा पाठवणे चांगलेच महागात पडले आहे. बड्या कंपन्यांमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी या तरुणांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. भूषण काटे या तरुणाने दिलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला.

नामांकित कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक

भूषणने एका जॉब पोर्टलवर आपला बायोडाटा टाकला होता. त्यानंतर त्याला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. आपल्याला नामांकित कंपनीत नोकरी मिळाली आहे, असे सांगून त्याने भूषणला संबंधित खात्यावर 2900 रुपये टाकण्यास सांगितले. मात्र, भूषणने पैसे न भरता तक्रार दाखल केल्याने त्याची फसवणूक टळली.

हेही वाचा - यवतमाळमध्ये क्रेडिट कार्डद्वारे २ लाखांचा गंडा; मुख्य सूत्रधार मध्य प्रदेशमधील

सध्या सर्वत्र मंदीचे सावट आहे. त्यामुळे तरुण जमेल त्या मार्गाने नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. याच अपरिहार्यतेचा फायदा घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. परदेशात किंवा नामांकीत कंपनीत नोकरी मिळाल्याचे या तरुणांना भासवले जाते. नंतर, कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कारण देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. याशिवाय, सायबर गुन्हेगारांनी बेरोजगार तरुणांना हेरून फोनद्वारे त्यांना नोकरचे आमिष दाखवून लुबाडल्याच्या घटनादेखील समोर आल्या आहेत.

नोकरीसाठी इंटरनेटद्वारे बायोडाटा पाठवताना काय काळजी घ्याल?

नोकरीच्या शोधासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुनच माहिती मिळवावी.

कुणाच्या सांगण्यावरुन व्यक्ती किंवा बँकेची माहिती देऊ नये अथवा, पैसे पाठवू नये.

फसवणूक होत आहे, असे वाटल्यास सायबर क्राइम पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

Intro:नामांकित कंपन्यांच्या नोकरीचे आमिष बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक....

Body:
नाशिक शहरातील काही तरुणांना जॉब पोर्टलवर आपलं बायोडेटा पाठवणे चांगलेच महागात पडले आहे सायबर गुन्हेगारांनं तरुणांची बनावट जॉब पोर्टल वर शहरातील बड्या कंपन्यांमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे....

सध्य सर्वत्र आर्थिक मंदीचे सावट असून अनेक उच्चशिक्षित बेरोजगार तरुण नोकरीच्या शोध साठी व ऑनलाइन चा वापर करत आहे..आणि अशातच त्यांची फसवणुक होण्याच्या घटना वाढल्या आहेत.....नाशिकच्या भूषण काटे या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार वरून,त्यांने एका जॉब पोर्टल वर रिजुम टाकला होता, त्यानंतर त्याला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला,त्याने सांगितले आपल्याला नामांकित कंपनीत नोकरी मिळाली असून संबंधित खात्यावर 2900 रुपये टाका, असे सांगत त्यांनी ऑनलाईन पैसे भरण्यास सांगितले..मात्र काटे याने पैसे भरले नसल्याने त्यांची फसवणूक टाळली.

सध्या शहरातील एका नामवंत कंपन्यांच्या नावाखाली तरुणांची फसवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे...बनावट वेब साईट बनून,नंतर तुम्हाला नोकरी लागल्याचे सांगत फोनवरूनच मुलाखत घेऊन सरकारी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पैसे भरण्यास सांगितलं जातं अशातचं बेरीजगार युवकांची फसवणूक होतं आहे..अनेकदा बेरोजगार तरुण नोकरी संबंधित संकेतस्थळावर ऑनलाइन माहिती भरत असतात, त्या माहितीचा वापर करून सायबर गुन्हेगार बेरोजगार तरुणांना हेरून कंपनीतून बोलत असल्याचे सांगतात, या तरुणाला शैक्षणिक पात्रता ही आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्याची आहे,त्यामुळे आपणास फोन केला असून आपण ऑनलाईन अर्ज भरा असे सांगितले जाते,त्यानंतर अनोळखी व्यक्तीकडून बँक खाते क्रमांक दिला जातो ,त्यात पैसे शुल्क भरल्यानंतर तोंडी परीक्षेत पात्र ठरायचे सांगून फोनवर मुलाखत घेतली जाते, सांगून विविध कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी पैशाची मागणी केली जाते व पुन्हा बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले जाते.अशातून अनेक बेरोजगार युवकांची फसवणूक होतं असून,अनेक फसवणूक झालेले तरुण पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास धजावत नाही..

#नोकरी साठी सोशल मीडियाच्या माध्यमातून रिजुम पाठवतांना काय काळजी घ्याल..
1) नोकरीच्या शोधा साठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन माहिती घेणे..
2) कोणाच्या सांगण्यावरून बँकेची व्यक्ती माहिती देऊन नये,अथवा पैसे पाठू नये..
3) फसवणूक होतं आहे वाटतल्यास सायबर क्राइम पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा..

वन टू वन
तन्मय दीक्षित- सायबर तज्ञ

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.