नाशिक - खोटे गुन्हे दाखल व्हायला हे महाविकास आघाडी सरकार ( Maha Vikas Aghadi Govt ) नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांच्या पत्नी अमृता फडणवीस ( Amrita Fadnavis ) यांनी केलं आहे. जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awad ) यांच्यावर झालेल्या कारवाई बाबत त्यांनी हे वक्तव्य केलं. नाशिकला आयोजित एका खाजगी कार्यक्रम दरम्यान त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
चित्रपटात जाऊन गुंडागर्दी - ठाण्यातील चित्रपटगृहात झालेल्या मारहाण प्रकरणावरही अमृता फडणवीस यांनी बोलतांना म्हटलं की महाराष्ट्रात आता पूर्वीसारखं गुंडाराज राहिलेलं नाही. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा विरोध करायचा असेल तर त्याची एक प्रक्रिया असते. तुम्ही थेट चित्रपटात जाऊन गुंडागर्दी नाही करू शकत. हे महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती नाही त्यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण - राष्ट्रवादीचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड NCP MLA Jitendra Avhad यांचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांना वर्तकनगर पोलिसांनी मारहाणीच्या आरोपाखाली अटक Arrested on charges of assault केली होती. आता एका महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप woman accused him of molestation केला आहे. आव्हाड यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४ अन्वये ठाण्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असताना आणि कार्यक्रम संपून एकनाथ शिंदे त्यांच्या गाडीतून परत जात असताना त्यांनी महिलेच्या खांद्यावर हात ठेवून इथे का ? असा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. ती मध्यभागी उभी आहे का, बाजूला जा असे करून त्याने तक्रारदाराला तेथून काढले आणि लोकांना कळलेही नाही. आव्हाड यांचा हेतू योग्य नसल्याचा आरोप महिलेने केला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.