ETV Bharat / state

नाशकात वेतन कपातीच्या कारणावरून पालिका कर्मचाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी - नाशिक पालिका कर्मचाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

नाशिक महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये आज फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. पालिकेच्या लेखा विभागात घडलेल्या या प्रकारानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.

fighting
नाशकात वेतन कपातीच्या कारणावरून पालिका कर्मचाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; घटनेची आयुक्तांकडून गंभीर दखल
author img

By

Published : May 8, 2020, 6:24 PM IST

Updated : May 8, 2020, 11:38 PM IST

नाशिक - महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये आज फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. पालिकेच्या लेखा विभागात घडलेल्या या प्रकारानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. अग्निशामक विभागात काम करणाऱ्या एका कर्मचार्‍याचा वेतनातून दरमहा 50 हजार रुपयांची अतिरिक्त कपात होत होती. ही कपात कोणत्या कारणावरून केली जाते याचा जाब हा कर्मचारी लेखा विभागात वारंवार करत होता. मात्र, लेखा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या कर्मचाऱ्यांचा समस्येवर तोडगा न निघाल्याने या कर्मचाऱ्याने आज लेखा विभागातील एका कर्मचाऱ्यास मारहाण केली.

नाशकात वेतन कपातीच्या कारणावरून पालिका कर्मचाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
दोन कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीला नाशिक महानगर पालिकेच्या लेखा विभागातील गलथान कारभार कारणीभूत आहे. मात्र असे असले तरी या हाणामारीत लेखा विभागातील एका कर्मचाऱ्याला वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे आणि पालिकेच्या गलथान कारभारामुळे नाहक मारखाण्याची वेळ आल्याने त्यानेही संतप्त भावना व्यक्त केली.नाशिक महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयातील लेखा विभागात आज सकाळच्या सुमारास झालेल्या हाणामारीच्या घटनेन पालिका मुख्यालयात भीतीच वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या फ्री स्टाईल हाणामारी नंतर पालिका आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेत दोन्ही कर्मचाऱ्यांना समज बजावली आहे. दरम्यान, या घटनेमुळे पालिकेच्या लेखा विभागात सुरू असलेल्या गलथान कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Last Updated : May 8, 2020, 11:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.