ETV Bharat / state

ऊसतोडणीदरम्यान सापडलेल्या बछड्यांची मादीसोबत भेट, निफाडच्या करंजी गावातील घटना - नाशिक बिबट्याची पिल्ली सापडली

सोमवारी निफाड तालुक्यातील करंजी येथील काळू अडसरे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना कामगारांना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले होते. अडसरे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी याबाबत तातडीने वन विभागाला ही बाब कळवली. वनविभागाने घटनास्थळी धाव घेत दोन बछड्यांना निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणले. बछडे उसाच्या क्षेत्रात न दिसल्यास बछड्यांची माता व्याकूळ होईल....

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Dec 22, 2020, 6:37 PM IST

नाशिक - काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यात भरकटलेल्या तिघा बछड्यांची त्यांच्या आईसोबत भेट घालून देण्यात वन विभागाला यश आल्यानंतर याच प्रकारे पुन्हा एकदा निफाड तालुक्यातील करंजी याठिकाणी वन विभागाने मादी आणि तिच्या पिल्लांची भेट घडवून आणल्याची घटना समोर आली आहे.

नाशिक

निफाडच्या वनविभाग पथकाची कामगिरी

बिबट्या या वन्य प्राण्याला लपण्यासाठी सर्वात सुरक्षित जागा हे उसाचे शेत असते. आपल्या बछड्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी एका उसाच्या शेतात सोडलेल्या मादी बिबट्या आणि तिच्या दोघा पिल्लांची भेट घडवून आणण्यात निफाडच्या वन विभागाला यश आले आहे. सोमवारी निफाड तालुक्यातील करंजी येथील काळू अडसरे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना कामगारांना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले होते. अडसरे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी याबाबत तातडीने वन विभागाला ही बाब कळवली. वनविभागाने घटनास्थळी धाव घेत दोन बछड्यांना निफाड येथील वनविभागाच्या रोपवाटिका केंद्रात आणले. बछडे उसाच्या क्षेत्रात न दिसल्यास बछड्यांची माता व्याकूळ होईल, बिबट्या हिंसक होऊन जवळील नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता लक्षात घेता वनविभागाने या बछड्यांची त्यांच्या आईसोबत भेट घालून देण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळच्या सुमारास ही दोन बछडी एका कॅरेटमध्ये ठेऊन त्यावर लोखंडी जाळी ठेवण्यात आली. या जाळीला एक दोरी बांधण्यात आली व ही दोरी एका कर्मचाऱ्याच्या हातात दूर अंतरावर देण्यात आली. जेणेकरून मादीला आपल्या बछड्यांना घेऊन जाण्यास अडथळा निर्माण होऊ नये. रात्री जवळपास 11 वाजेच्या सुमारास याठिकाणी पिलांच्या शोधत आलेली मादी आपल्या बछड्यांना घेऊन निघून गेली आहे.

पिलांच्या शोधात व्याकूळ झालेल्या मादी पिलांना घेऊन गेली

विशेष म्हणजे यावेळी वन विभागाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर वन विभागाच्या वाहनांमध्ये बसून होते. उच्च क्षमतेच्या नाइट मोड कॅमेऱ्यातून बछडे ठेवलेल्या घटनास्थळाचे निरीक्षण करीत होते. यावेळी आपल्या पिलांच्या शोधात व्याकूळ झालेल्या मादीने पिलांना घेऊन गेल्यानंतर वनविभाग अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला. वनविभागाच्या या कामगिरीचे संपूर्ण निफाड तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.