ETV Bharat / state

शाळेचा पहिला दिवस..! नाशिकच्या प्रबोधिनी शाळेत विशेष विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत - physcially abled

नाशिकच्या प्रबोधिनी शाळेत आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या विशेष मुलांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून त्याचे स्वागत करण्यात आले.

प्रबोधिनी शाळेत आजच्या पहिल्या दिवशी मुलांच्या हस्ते आकाशात फुंगे सोडून त्यांचे स्वागत करण्यात आले.
author img

By

Published : Jun 17, 2019, 6:49 PM IST

नाशिक - मानसिक दृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या नाशिकच्या प्रबोधिनी शाळेत आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या विशेष मुलांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी त्यांच्यासाठी गाणेही गायले. प्रबोधिनी शाळेने आतापर्यंत २५ मानसिक दृष्ट्या अपंग मुलांना शिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे.

प्रबोधिनी ट्रस्ट संचलित प्रबोधिनी विद्यामंदिर ही शाळा गेल्या ४२ वर्षांपासून मानसिक अपंग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. या शाळेत आज साडेतीनशेहून अधिक विशेष मुलांना शिक्षण दिले जाते. ७ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढवून त्यांना स्वावलंबी बनवण्यावर भर दिला जातो. तसेच यातील तीस विद्यार्थी आज नामांकित कंपनीमध्ये किमान वेतनावर काम करत आहे.

मुख्यधापक रमेश वणीस यांची प्रतिक्रिया

विशेष विद्यार्थ्यांचे गुण ओळखून शाळतून त्यांना चालना देण्यात येते. पुस्तकी अभ्यासा सोबत विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांना राज्य आणि क्रीडा स्पर्धेत सहभागी केले जाते. सांस्कृतिक विभागा मार्फत घेण्यात येणाऱ्या नाट्य विभागातील स्पर्धेत गेल्या तीन वर्षापासून या शाळेतली विद्यार्थी प्रथम क्रमांक पटकवत आहेत. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये फिजिओथेरपी तसेच वर्तन समस्या बाबत मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार केले जातात. तसेच शहरा बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी या शाळेत वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. २०१५-१६ या काळात शासनाच्या फुले-शाहू-आंबेडकर हा पंधरा लाखाचा पुरस्कार शाळेला मिळाला आहे.

आज झालेल्या कार्यक्रमाला शाळेच्या अध्यक्ष सुलभा सरोटे, पूनम यादव ,मनीषा नलगे, मनीषा अवचल, मिलिंद मुंद यांच्यासह मुख्याध्यापक रमेश वणीस उपस्थित होते. यावेळी WOW ग्रुपच्या महिलांनी या विशेष मुलांना फुले आणि खाऊ देत त्यांचे पहिल्या दिवशी शाळेत स्वागत केले.

Intro:विशेष विद्यार्थ्यांचं शाळेच्या पहिला दिवशी उत्साहात स्वागत...प्रबोधिनी शाळेतून स्ववलंबी होतं विद्यार्थी समाजाच्या मुख्य प्रवाहात...

Body:मानसिक दृष्टया अपंग असलेल्या विद्यार्थीनां शिक्षण देणाऱ्या नाशिकच्या प्रबोधिनी शाळेत आजच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं मोठया उत्साहात स्वागत करण्यात आलं..ह्या विशेष मुलांच्या हस्ते आकाशात फुंगे सोडून त्यांच्या साठी शिक्षकांनी गाणे म्हणून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं,प्रबोधिनी शाळेतुन शिक्षण देऊन आता पर्यंत 25 मुलांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे....

प्रबोधिनी ट्रस्ट संचलित प्रबोधिनी विद्यामंदिर ही शाळा गेल्या 42 वर्षांपासून मानसिक अपंग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे, या शाळेत आज साडेतीनशे हुन अधिक विशेष मुलांना ह्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं, 7 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनं मधील आत्मविश्वास वाढून त्यांना स्वावलंबी बनवण्यावर भर दिला जातो, तसेच यातील तीस विद्यार्थी आज नामांकित कंपनीमध्येकिमान वेतनावर काम करत आहे,

शाळा विशेष मुलांचे विद्यार्थ्यांचे गुण ओळखून त्यांना चालना देते.
पुस्तकी अभ्यासा सोबत, विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांना
राज्य आणि क्रीडा स्पर्धेत सहभागी केलं जातं,सांस्कृतिक विभागा मार्फत घेण्यात येणाऱ्या नाट्य विभागातील स्पर्धेत
गेल्या तीन वर्षापासून प्रबोधिनी विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थी प्रथम क्रमांक पटकवत आहे,

विद्यार्थ्यांना शाळेमध्ये फिजिओथेरपी तसेच वर्तन समस्या बाबत मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार केले जातात,तसेच शहरा बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी या शाळेत होस्टेल ची व्यवस्था करण्यात आली आहे,
2015 -16 या काळात शासनाच्या फुले-शाहू-आंबेडकर हा पंधरा लाखाचा पुरस्कार शाळेला मिळाला आहे ,एकूणच मानसिक दृष्टया अपंग असलेल्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी,यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून स्वावलंबनाचे धडे देत त्यांचं पुनर्वसन करण्याचे काम प्रबोधिनी विद्या मंदिर शाळा करत आहे .. आज झालेल्या कार्यक्रमाला शाळेच्या अध्यक्ष सुलभा सरोटे, पूनम यादव ,मनीषा नलगे,मनीषा अवचल, मिलिंद मुंद यांच्यासह मुख्याध्यापक रमेश वणीस उपस्थित होते,यावेळी wow ग्रुपच्या महिलांनी ह्या विशेष मुलांना फुले आणि खाऊ देत त्यांचं पहिल्या दिवशी शाळेत स्वागत केलं...

बाईट रमेश वणीस मुख्यधापक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.