नाशिक - दिंडोरी तालुक्यातील सातत्याने ढगाळ हवामान व धुक्यामुळे शेतातील द्राक्षं, टोमॅटो, भाजीपाला, कांद्या या पिकांवर बुरशी, सुकवासारख्या रोगांचे संक्रमण वाढले आहे. उद्धव साहेबांनी प्रत्येक बांधावर जात पिकांची पाहाणी केली होती. परंतू, आता मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांचा उद्धव साहेबांना विसर पडला की काय? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
हेही वाचा -नाशिक: औरंगाबाद येथील बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला; दोघांचा शोध सुरू
ढगाळ हवामान व धुक्यांमुळे शेतातील पिकांवर बुरशी, सुकवासारखे रोगांचे संक्रमण वाढले आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक बांधावर जात पिकांची पाहाणी केली होती. लाखो रुपये या पिकांसाठी खर्ची करूनही बदलत्या हवामानामुळे डोळ्यासमोर ही पिके कोमेजून गेली आहेत. कांद्याचे हिरवीगार पात वाळून जात आहे. मोलामहागाची कीटकनाशके फवारणीचे कित्येक हात देऊनही धुके व ढगाळ हवामानाच्या चादरीमुळे हाती आलेली पिके कशी वाचवायची? असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा -
दिंडोरी तालुक्यातील व सप्तश्रृंगी गडाच्या पश्चिम भागातील अंबानेर, चामदरी, गोलदरी, चंडीकापूर, मुळाणे, भातोडे, कोल्हेर, पिंपरी, माळे दुमाला, अस्वलीपाडा, पुणेगाव, खोरी, पिंगळवाडी या भागातील द्राक्षं, भाजीपाला ढगाळ हवामानामुळे धोक्यात आली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाली नाहीत. राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
द्राक्षे, कांदा काढणीसाठी सुरुवात झाली असून त्यांचे भाव घसरले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. बेभरवशाचे हवामानामुळे आता शेडनेटमध्ये शेती करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, राष्ट्रीयकृत बँका आर्थिक मदत करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता घरातील खर्च कसा भागवणार हिच चिंता शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीसमोर व्यक्त केली.