चांदवड (नाशिक) - कोथिंबिरीचा भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कोथिंबिरीच्या एका जुडीला एक रुपया पेक्षाही कमी भाव मिळत असल्याने दुगाव येथील शेतकऱ्याने कोथिंबिरीच्या 600 जुड्या अक्षरशः रस्त्याचा कडेला फेकून दिल्या आहेत. नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांची नाराजी
रामदास ठाकरे हे 600 कोथिंबिरीच्या जुड्या घेऊन विक्रीसाठी मनमाड बाजार समितीत आले होते. मात्र बाजार समितीत अवघ्या 600 रुपयात 600 कोथिंबिर जुड्यांचा लिलाव झाला. या जुड्यांना केवळ 1 रुपया भाव मिळाल्याने संतप्त होऊन शेतकऱ्याने कोथिंबिरीच्या जुड्या फेकून दिल्या आहेत. कमी दर मिळत असल्याने आणि उत्पादन आणि दळणवळणाचा दोन हजार रुपयांचा खर्च देखील मिळत नसल्याचे रामदास ठाकरे यांनी सांगितले आहे.
भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी झालेल्या लिलावात कोथिंबिरीला अवघा एक रुपया प्रति जुडी एवढा भाव मिळाला. या भावाने उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघणे शक्य नसल्यामुळे शेतकऱ्यांवर जुड्या फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोथिंबीरीला मातीमोल बाजारभाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - जालन्यातील सीताफळांना दिल्लीत मिळतोय चौपट भाव; "विकले ते पिकेल" धोरणाचा झाला फायदा
अवकाळी पावसानेही शेतकऱ्यांचे नुकसान
उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्याता आता शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्या पुढील अडचणी अजुन वाढल्या आहेत. अशा स्थितीत नक्की काय करावे काय मार्ग काढावा असा प्रश्न शेतकऱ्या समोर आहे.
हेही वाचा - एकनाथ खडसेंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज