ETV Bharat / state

नाशिक : कोरोनाविरोधातील युद्धात मनमाड येथे माजी सैनिक मैदानात

कोरोना विरोधातील युद्धात वैद्यकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा, सफाई कर्मचारी आदी त्यांसह अनेक जण आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांना या युद्धात मदत व्हावी यासाठी मनमाड येथील माजी सैनिक आणि होमगार्डनी कंबर कसली आहे.

माजी सैनिक
माजी सैनिक
author img

By

Published : May 6, 2020, 11:08 AM IST

मनमाड (नाशिक) - कोरोनाचा देशभरात वाढता प्रभाव पाहता प्रत्येकजण आपल्या परीने देशावर आलेल्या संकटाशी टाळण्यासाठी मदत करत आहेत. पोलीस यंत्रणा असो वा प्रशासकीय यंत्रणा हे सर्वचजण लढताना दिसत आहेत. या लढ्यात मनमाडमध्ये काही माजी सैनिक सध्या मनमाड शहरातील या पोलीस व वैद्यकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. जवळपास 32 माजी सैनिक व 30 होमगार्ड सध्या स्वखुशीने व विनामोबदला ही सेवा बजावत असून या सर्वांचे मनमाड शहरातील जनतेकडून कौतुक करण्यात येत आहे.

कोरोनाविरोधातील युद्धात मनमाड येथे माजी सैनिक मैदानात

कोरोनाला हरविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला अनेक सामाजिक संस्था मदत करत आहेत. यात मनमाड शहरातील माजी सैनिक यांच्या संघटनेने पोलीस व मनमाड नगर पालिका यांच्याकडे विचारपूस करुन स्वखुशीने व विनामोबदला सेवा देण्यासाठी विचारणा केली होती. दोन्ही यंत्रणेने होकार दिल्यानंतर या सर्व माजी सैनिकांनी आपले नियोजित काम आवरून वेळा ठरवून घेत शहरातील भाजी मंडई, बँक, सरकारी रुग्णालय तसेच शहरात येणाऱ्या सीमा याभागात कर्तव्य बजावत आहेत. ते 24 तास त्यांच्या प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून सेवा करत आहेत.

त्यांच्यासह मनमाड शहरातील 30 होमगार्ड देखील सहभागी झाले असून तेही विनामोबदला काम करत आहेत. या सर्वांचे मनमाड शहरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. माजी सैनिकांनी देशाला जेव्हा आमची गरज असेल तेव्हा आम्ही तत्पर असल्याचे सांगितले.

आम्ही सर्व माजी सैनिक जेव्हा कर्तव्यावर होतो तेव्हा आम्हाला एकच शिकविले जाते जेव्हा देश संकटात सापडेल आणि देशाला तुमची गरज असेल तेव्हा तुम्ही वेळ काळ न बघता सदैव लढण्यास तयार रहावे. त्यामुळे आम्ही आज स्वखुशीने व कुठलाही मोबदला न घेता मदतीसाठी तयार आहोत, असे माजी सैनिकांनी सांगितले. या कामाचे त्यांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

हेही वाचा- नाशिक जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरातील सर्व दुकाने उघडणार - जिल्हाधिकारी सुरज मांढरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.