ETV Bharat / state

काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा शिवसेनेत प्रवेश - इगतपुरी मतदारसंघाच्या आमदार निर्मला गावित

काँग्रेस पक्षाच्या इगतपुरी मतदारसंघाच्या आमदार निर्मला गावित यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. आज (बुधवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा शिवसेनेत प्रवेश
author img

By

Published : Aug 21, 2019, 3:56 PM IST

मुंबई - काँग्रेस पक्षाच्या इगतपुरी मतदारसंघाच्या आमदार निर्मला गावित यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. आज (बुधवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. निर्मला गावित यांनी आपल्या कुटुंबासह शिवसेनेत प्रवेश केला. माणिकराव गावित हे काँग्रेस मधले मोठे घराणे आहे. इंदिरा गांधींचा आणि गावित कुटुंबियांचे सौख्य होते.

काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा शिवसेनेत प्रवेश

निर्मला गावित पक्ष बांधणीसाठी पुढे काम करतील असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गावित यांच्या पक्ष प्रवेशावर बोलताना म्हटले. तसेच उध्दव ठाकरे म्हणाले, "उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे प्राबल्य आहे. मात्र, निर्मला गावित यांच्या येण्याने राहिलेली उणीव ही भरून निघेल. शिवसेनेच्या जागा किती येतील माहीत नाही, मी अंदाजही बांधत नाही पण जिंकायचे म्हणजे जिंकायचे"

पार्श्वभूमी -

नाशिकच्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून निर्मला गावित या २००९ आणि २०१४ अशा दोन वेळा आमदार म्हणून निवडून येत होत्या. मात्र यावेळी त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. निर्मला गावित या काँग्रेसचे माजी खासदार माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. माणिकराव हे सलग ९ वेळा नंदुरबार मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येत होते. २०१४ साली त्यांचा भाजपच्या हिना गावित यांनी पराभव केला होता. त्यानंतर त्यांचे पुत्र भरत गावित हे २०१९ साठी लोकसभा लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र काँग्रेसने के.सी. पाडवी यांना उमेदवारी दिल्याने भरत गावित देखील नाराज आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

Intro:मुंबई - काँग्रेसच्या इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिल्यावर आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला Body:निर्मला गावित यांनी कुटुंबासह शिवसेनेत प्रवेश केला. माणिक राव गावित हे काँग्रेस मधलं मोठं घराणं आहे. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कुटुंबावर प्रेम केलं होतं. निर्मला गावित पक्ष बांधणीसाठी पुढे काम करतील असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गावित यांच्या पक्ष प्रवेशावर बोलताना म्हटले.
उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे प्राबल्य आहेचं पण निर्मला गावित यांच्या येण्याने राहिलेली उणीव ही भरून निघेल. शिवसेनेच्या जागा किती येतील माहीत नाही, मी अंदाज बांधता नाही पण जिंकायच म्हणजे जिंकायचं अशी प्रतिक्रिया उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा येतील यावर उत्तर दिले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.