ETV Bharat / state

नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात आढळला मांडूळ साप, सर्पमित्राने दिले जीवनदान - Eryx johnii snake found

मांडूळ सापाची आंतरराष्ट्रीय बाजारात छुप्या पद्धतीने खरेदी विक्री केली जाते. या सापामुळे दुर्धर आजार बरे होतात. तसेच, पैशांचा पाऊस पडण्याची क्षमता देखील या सापात असल्याची अंधश्रद्धा समाजात रुजली आहे. त्यामुळे, या सापाची कोट्यवधी रुपयांना तस्करी केली जाते. अनेकदा अंधश्रद्धेतून या मुक्या प्राण्याचा हकनाक बळी जातो. मात्र, याच दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाचे सर्पमित्र ऋषी कांबळे यांनी प्राण वाचवत त्याला जीवनदान दिले.

मांडूळ
मांडूळ
author img

By

Published : Oct 11, 2020, 3:20 PM IST

नाशिक- अंधश्रद्धेपोटी कोट्यवधी रुपयांमध्ये विकल्या जाणाऱ्या दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाला पाथर्डी फाटा परिसरातून एका सर्पमित्राने जीवनदान दिले आहे. स्थानिक नागरिकांकडून साप आढळून आल्याची माहिती मिळताच वनविभाग आणि सर्पमित्राने मांडुळाला नैसर्गिक अधिवासात सोडले.

माहिती देताना वन अधिकारी विवेक भदाणे आणि सर्पमित्र ऋषी कांबळे

मांडूळ सापाची आंतरराष्ट्रीय बाजारात छुप्या पद्धतीने खरेदी विक्री केली जाते. या सापामुळे दुर्धर आजार बरे होतात. तसेच, पैशांचा पाऊस पडण्याची क्षमता देखील या सापात असल्याची अंधश्रद्धा समाजात रुजली आहे. त्यामुळे, या सापाची कोट्यवधी रुपयांना तस्करी केली जाते. अनेकदा अंधश्रद्धेतून या मुक्या प्राण्याचा हकनाक बळी जातो. मात्र, याच दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाचे सर्पमित्र ऋषी कांबळे यांनी प्राण वाचवत त्याला जीवनदान दिले.

दरम्यान, मांडूळ हा बिनविषारी सापांची दुर्मिळ जात आहे. या सापाचे तोंड आणि शेपूट सारखे असते. हा साप पैशांचा पाऊस पाडतो, यामुळे दुर्धर आजार देखील बरे होतात, अशी अंधश्रद्धा असल्याने अनेकदा या सापाची कोट्यवधी रुपयांना तस्करी केली जाते. मात्र, काही सतर्क नागरिकांमुळे या सापाचा बचाव झाला. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडल्याचे समाधान सर्पमित्रांनी व्यक्त केले आहे.

तसेच, कुठल्याही अंधश्रद्धांना बळी पडून मुक्या जनावरांना इजा करू नका, असे आवाहन यावेळी सर्पमित्र आणि वन विभागाच्या वतीने करण्यात आले. दरम्यान, सापाला वेळेत रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा- जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष : कोरोनाकाळात मानसिक रुग्णांमध्ये मोठी वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.