नाशिक - पश्चिम विधानसभा मतदार संघातून कामगार आणि उद्योजकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी, अशी मागणी नाशकातील उद्योजकांनी केली आहे. उद्योजक असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास नाशिकमधील उद्योजक आणि कामगार मिळून त्याला बहुमताने विजयी करु, असा दावा या उद्योजकांनी केला आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उद्योजक आणि कामगरांच्या प्रश्नांची जाण असलेल्या व्यक्तीला उमेदवारी मिळावी, यासाठी नाशिकमधील उद्योजक एकत्र आले आहेत. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा कामगारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. याच मतदारसंघात नाशिकच्या अंबड आणि सातपूर या दोन प्रमुख औद्योगिक वसाहती आहेत. मात्र, या मतदारसंघाच्या स्थापनेपासून एकही मोठा उद्योग आजवरच्या लोकप्रतिनिधींना आणता आलेला नाही. शिवाय कामगरांच्या निवृत्ती वेतनापासून ते स्वतंत्र अद्यायावत रुग्नालयाची मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत जो पक्ष उद्योग क्षेत्राची जाण असलेल्या उद्योजकाला उमेदवारी देईल, त्याच पक्षाच्या पाठीमागे उद्योजक आणि वसाहतीतील कामगार उभे राहतील, असा इशारा उद्योजकांनी दिला आहे.
हेही वाचा - पत्रकाराला आमदार करणारा 'औरंगाबाद मध्य मतदारसंघ'
विशेष म्हणजे हा मतदारसंघ - भाजपच्या ताब्यात आहेत. नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमाचे विद्यमान अध्यक्ष भाजपचे नगरसेवक शशिकांत जाधव आणि भाजपचे उद्योग आघाडीचे पदाधिकारी प्रदीप पेशकार हे देखील या मतदारसंघातून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे उद्योजकांच्या या मागणीने जाधव आणि पेशकार यांच्या भाजपतील दावेदारीला बळ मिळाल आहे. दरम्यान, आता नाशिकमधील उद्योजकांच्या या मागणीला सत्ताधारी भाजप पक्ष प्रतिसाद देनार की, इतर पक्ष या मागणीचा फायदा घेऊन संधीचे सोनं करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - 'एका टाळीसाठी 86 मतदारसंघातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अमेरिकेला विकले'