ETV Bharat / state

वासो संस्थेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा 1 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा

वासो संस्थेत काम करणाऱ्या राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांकडे  शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

author img

By

Published : Jul 28, 2019, 10:36 PM IST

वासो संस्थेतील कंञाटी कर्मचाऱ्यांचा 1 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा

नाशिक - वासो संस्थेत काम करणाऱ्या राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 1 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

स्वच्छतेची चळवळ ग्रामीण भागातून राबवण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत वासो (पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था)मार्फत प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समितीत गटसंसाधन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यात कंत्राटी तत्वावर काम करणारे गटसमन्वयक व समूह समन्वयक आठ हजार रुपये मानधनावर काम करतात.

गेल्या सात वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापन, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मोहीम, शौचालय वापराबाबत जनजागृती, स्वच्छता दर्पण असे विविध उपक्रम कर्मचारी यशस्वीपणे राबवत असताना शासन मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत.

यासंबंधी जिल्हापरिषद अध्यक्ष, मुख्यकार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी आणि पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी ईशादिन शेळकंदे यांना कर्मचाऱ्यांनी निवेदन देऊन मागण्यांसंदर्भात प्रशासन स्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे. यावेळी, जिल्ह्यातील संघटनेचे सचिव वैभव पाटील, गणेश सरोदे, मोहन वाघ, संदीप पवार, माधव शेळके आदी उपस्थित होते.

Intro:राज्यात स्वच्छ भारत अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जात असुन याकामात महाराष्ट्र शासनाने देशपातळीवर विविध पुरस्कार घेत देशात महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. स्वच्छतेची चळवळ ग्रामीणभागातुन राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत वासो संस्थेकडून प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत  पंचायत समितीत पाणी व स्वच्छता विभागाचा गटसंसाधन केंद्र स्थापन करण्यात आले असुन यात कार्यरत काम करणारे कंञाटी गटसमन्वयक , समुह समन्वयक कार्यरत आहेत.परंतु यांना अतिशय कमी आठ हजार रुपये मानधन देण्यात येत आहे Body:गेल्या सात वर्षात स्वच्छतेच्या , जाणीवजागृती ,सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन , संतगाडगेबाबा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मोहीम ,सार्वजनिक पिण्याचे पाणीगुणवत्ता स्रोतांचे मुल्यमापन, शौचालय वापराबाबत जनजागृती , स्वच्छता दर्पण असे विविध कार्यक्रम हे कर्मचारी यशस्वीपणे  राबवत असतांना  देखील केद्र व राज्य शासनाच्या महत्वकांक्षी योजनेत हे कंञाटी कर्मचारींची दखल शासनाकडुन घेण्यात आली नाही यामुळे महाराष्ट्रातील सर्व पंचायत समितीत कार्यरत कंञाटी कर्मचारीं शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या समस्या सोडवण्यासाठी एक आॕगष्ट पासुन काम बंद करत संपाचे हत्यार उपसणार आहेConclusion:यात नाशिक जिल्ह्यातील तालुका समन्वयक सहभागी होणार असुन याचे निवेदन जिल्हापरिषदेचे अध्यक्ष , मुख्यकार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी व पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी ईशादिन शेळकंदे यांना नाशिक जिल्ह्यातील संघटनेचे सचिव वैभव पाटील , गणेश सरोदे,मोहन वाघ, संदिप पवार , माधव शेळके,यांनी याबाबत निवेदन देवुन मागण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.