ETV Bharat / state

येवल्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना लॉकडाऊनचा फटका - nashik live news

सकाळी अकरा वाजेपर्यंत शेतमाल विकण्यास परवानगी असल्याने कमी वेळात मिरची विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील अजून निघाला नसून मिरची विकली जात नसल्याने ती शेतातच पडून आहे. तर विक्री होत नसल्याने मिरची झाडावरच लाल होत आहे. तरी शेतमाल विक्रीला वेळ मर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी येवल्यातील शेतकरी करीत आहे.

मिर्ची उत्पादक शेतकरी
मिर्ची उत्पादक शेतकऱ्यांना लॉकडाऊनचा फटका
author img

By

Published : May 23, 2021, 11:02 AM IST

येवला (नाशिक) - लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमध्ये आठवडी बाजार व सर्व भाजीमंड्या ह्या बंद आहेत. याचा फटका आता येवल्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे. मिरची विक्री होत नसल्या कारणाने मिरची शेतातच पडून आहे. लॉकडाऊनमुळे मोठा आर्थिक फटका बसण्याच्या भितीने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मिर्ची उत्पादक शेतकऱ्यांना लॉकडाऊनचा फटका
वेळेच्या मर्यादेमुळे मिरची शेतात पडून -

सकाळी अकरा वाजेपर्यंत शेतमाल विकण्यास परवानगी असल्याने कमी वेळात मिरची विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील अजून निघाला नसून मिरची विकली जात नसल्याने ती शेतातच पडून आहे. तर विक्री होत नसल्याने मिरची झाडावरच लाल होत आहे. तरी शेतमाल विक्रीला वेळ मर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी येवल्यातील शेतकरी करीत आहे.

खरीप पेरणी करता भांडवल उभे करण्याचा प्रश्न -

येवल्यातील नानासाहेब शिंदे या शेतकऱ्याने १ एकरात मिरची पीक घेतले. त्या करता त्यांना २ लाख रुपये भांडवल लागले मात्र मिरची निघण्यास सुरुवात होताच कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे मिरची विकण्यास मर्यादा आल्याने पिकवलेली मिरची शेतातच पडून राहत असल्याने शेतकरी परत एकदा संकटात सापडला आहे. खरीपच्या पेरणी करता भांडवल कसे उभे करावे असा प्रश्न नानासाहेब शिंदे या शेतकऱ्याला पडला आहे.

हेही वाचा - चितेवरून अचानक उठून बसला मृतदेह, स्मशानभूमीत गोंधळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.