नाशिक - जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष,गहू,कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.सरकारने नुकसानीचे पंचनामे करून लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजाने केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील ओझर, निफाड,कळवण, दिंडोरी, नांदूरशिंगोटे,वैतरणा आदी भागात मुसळधार पाऊस झाला. ओझर भागात अवकाळी पावसामुळे गव्हाचे मोठे नुकसान झाले,तर निफाड,दिंडोरी तालुक्यात द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. हिवाळ्यात दिवस-रात्र शेकोटी पेटऊन बागा वाचविण्यासाठी प्रयत्न करून झाले असताना पुन्हा एकदा द्राक्षबागांवर संकट उभे राहिले आहे.
अवकाळी पावसामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाणे नंतर त्यात जीवजंतू पडण्यास सुरवात होते आहे. सरकारने नुकसानीचे पंचनामे करून लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बाजारात नागरिकांची तारांबळ
नांदुर-शिंगोटे परिसरात शुक्रवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह तसेच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला,येथे आठवडे बाजार असल्याने सायंकाळी दुकानदार व ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली, दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तसेच दमट हवामाना नंतर
अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे चापडगाव , ठाणगाव, नांदुर-शिंगोटे, मानोरी आदी भागात वादळी वाऱ्यासह आवकली पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामुळे काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. काही भागात वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडाला आलेली मोहोर गळून पडल्याचे चित्र बघायला मिळाले.
आंब्यांचा मोहर गळून पडला..
इगतपुरी तालुक्यातील वैतरणा या भागात अवकाळी पाऊस पडल्याने या पावसामुळे काकडी, टोमॅटो, कारले, भोपळा आणि बागायती पिकांना मोठा फटका बसला. अवकाळी पावसामुळे वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. गतवर्षी सर्वच आंब्यांना चांगला बहर आला होता, मात्र अवकाळी पावसामुळे आंब्याला फटका बसला असून आलेला मोहोर गळून गेला आहे. एक तास चाललेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली..
अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्षासह गहू,कांदा पिकांचे मोठे नुकसान.. - नाशिक अवकाळी पिकाने कांदा पिकाचे नुकसान
नांदुर-शिंगोटे परिसरात शुक्रवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह तसेच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला,येथे आठवडे बाजार असल्याने सायंकाळी दुकानदार व ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली, दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तसेच दमट हवामाना नंतरअवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.