येवला (नाशिक) - येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलाव टप्पा क्रमांक दोन या तलावात पाणीसाठा कमी होत असल्याने शहराला आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे.
1 मीटर पाणीसाठा शिल्लक
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलाव टप्पा क्रमांक दोनमध्ये सध्या एक मीटर इतका पाणीसाठा शिल्लक असल्याने व पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन मिळेपर्यंत शिल्लक पाणीसाठा पुरवावा लागणार असल्याने पाणीपुरवठा पाच दिवसाआड करण्यात आला आहे.
महिनाभर पाणी पुरवावे लागणार
पालखेडचे आवर्तन जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिले जाणार असल्याने तोपर्यंत शिल्लक पाणीसाठा हा पुरवावा लागणार असल्याने येवला शहराला पाणीपुरवठा हा आठवड्यातून एकदाच केला जात आहे, तरी जूनच्या पहिल्या आठवड्यातच पाणी आवर्तन मिळावे यासाठी या नगरपालिकेने पालखेड प्रशासनाकडे मागणी केली आहे.