ETV Bharat / state

विनयभंगाच्या आरोपानंतर नाशिकच्या डॉक्टरची आत्महत्या; सातव्या मजल्याहून मारली उडी

सिन्नर तालुक्यातील सोनंबे येथे एका डॉक्टरने गुलमोहर बिल्डिंगच्या सातव्या मजल्याहून उडी मारल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. गोविंद गारे असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे.

doctor attempted suicide in nashik
विनयभंगाच्या आरोपानंतर डॉक्टरची आत्महत्या;सातव्या मजल्याहून मारली उडी
author img

By

Published : Jan 14, 2020, 12:41 PM IST

Updated : Jan 14, 2020, 1:07 PM IST

नाशिक - सिन्नर तालुक्यातील सोनंबे येथे एका डॉक्टरने गुलमोहर बिल्डिंगच्या सातव्या मजल्याहून उडी मारल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. गोविंद गारे असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. गोरे यांच्या विरोधात एका महिला रुग्णाने विनयभंगाची तक्रार केल्या नंतर काही तासातच त्यांनी आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

गोविंद गारे सोमवारी (दि.13जानेवारीला) दुपारी सिन्नरला त्यांच्या नातेवाईकांकडे गेले. उद्योग भवन येथील गुलमोहर बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरील सदनिकेत ते होते. यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास गारेंनी इमारतीच्या टेरेसहून उडी मारुन आत्महत्या केली.

काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आल्यानंतर नातलगांनी डोकावून पाहिले. यावेळी त्यांना डॉक्टर पार्किंगमध्ये पडल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.
यानंतर त्यांना जवळच्या सिन्नर नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी व दोन अपत्य असा परिवार आहे.

सिन्नर पोलीस ठाण्यात महिलेने केली होती विनयभंगाची तक्रार

सिन्नर तालुक्यातील सोनाबेच्या बेंदवाडीतील एक महिला शनिवारी (दि. 11 जानेवारीला) सकाळी 11.30 च्या सुमारास डॉक्टरांकडे आली. पित्ताचा त्रास होत असल्याने ती स्नेहल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आली होती. तपासणी केल्यानंतर डॉक्टरने विनयभंग केल्याचे महिलेने सांगितले. याबाबत तिने सोमवारी (दि.13जानेवारीला) सिन्नर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली.

Intro:सिन्नर,विनयभंगाच्या आरोपा नंतर डॉक्टरची सातव्या माजल्यावरून उडी घेत आत्महत्या...

Body:नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सोनंबे येथील डॉ गोविंद एकनाथ गारे यांनी सिन्नरच्या येथील नातेवाईक राहत असलेल्या गुलमोहर बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून जीवन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे..गोरे यांच्या विरोधात एक महिला रुग्णाने विनयभंगाची तक्रार केल्या नंतर काही तासांतच डॉक्टर गारे यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे...आत्महत्या करण्या मागचे कारण शोधणे हे पोलिसांन समोर आव्हान असणार आहे...

डॉक्टर गोविंद गारे हे सोमवारी दुपारी सिन्नरला उद्योग भवन येथील गुलमोहर बिल्डिंगमध्ये राहणारे त्यांचे नातलग विष्णू गुरुळे यांच्या सातव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये आले होते, दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास डॉक्टर गारे इमारतीच्या टेरेसवर उडी मारून आत्महत्या केली, खाली काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आल्यानंतर नातलगांनी खाली डोकावून पाहिले असता त्यांना पार्किंग मध्ये पडल्याचे दिसले, त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना देत जवळच्या सिन्नर नगरपालिका रुग्णालयात दाखल केलं,मात्र उपचार दरम्यान डॉक्टर गारे मृत्यू झाला, त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा ,मुलगी असा परिवार आहे...

# सिन्नर पोलीस ठाण्यात महिलेनं केली होती विनयभंगाची तक्रार दाखल...
सिन्नर तालुक्यातील सोनाबेच्यां बेंदवाडीतील एक महिला शनिवार दिनांक 11 रोजी सकाळी 11 30 वाजेच्या सुमारास पित्ताचा त्रास होत असल्याने, डॉक्टर गोविंद गारे यांच्या स्नेहल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आली होती, व तिची तपासणी केल्यानंतर "तु मला आवडते" असे म्हणून गारे यांनी तिचा विनयभंग केल्याची फिर्यादया महिलेनं सिन्नर पोलीस ठाण्यात सोमवारी दिनांक 13 रोजी केले होती, त्यावरून डॉक्टर गारे यांच्या विरोधात महिला विनयभंग केल्याची गुन्हा दाखल करण्यात आला होता,गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासातच गारे यांनी आत्महत्या केल्याने तर्क वितरक लावले जात आहे...

Conclusion:
Last Updated : Jan 14, 2020, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.