ETV Bharat / state

कोरोना काळात पालकांचे छत्र हरपलेल्या अनाथ बालकांना जिल्हास्तरीय कृती दलाचा आधार - Nashik Update

कोरोना काळात दोन्ही पालक गमावलेली मुले बालकामगार, बेकायदेशीर दत्तक किंवा मानवी तस्करीस बळी पडू नये, यामुळे बालकांसाठी जिल्हास्तरीय कृती दल गठीत करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

कोरोना काळात पालक गमावलेल्या अनाथ बालकांना जिल्हास्तरीय कृती दलाचा आधार

author img

By

Published : May 20, 2021, 10:47 AM IST

नाशिक - जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचा वाढलेला संसर्ग व त्यामुळे बाधित व्यक्तिंचे व मृत्यूचे वाढलेले प्रमाण विचारात घेता, त्यांच्या बालकांच्या जीवनावर देखील गंभीर परिणाम होत आहे. काही प्रसंगी कोविड-19 रोगामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांची समस्या निर्माण झाली आहे. बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडत आहेत. तसेच या बालकांना बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांमध्ये ओढले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी या अनाथ मुलांचा आधारस्तंभ म्हणून, जिल्हापातळीवर गठीत करण्यात आलेले कृती दल कार्य करणार आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे

अनाथ झालेल्या बालकांच्या संरक्षण, संगोपन व पुनर्वसनाची जबाबदारी जिल्हास्तरीय कृती दलाची

जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले की, कोविडमध्ये दोन्ही पालक गमावलेली मुले बालकामगार, बेकायदेशीर दत्तक किंवा मानवी तस्करीस बळी पडू नये. तसेच कोविडमुळे दोन्ही पालक उपचाराकरीता रुग्णालयामध्ये दाखल असतील व बालकांचा सांभाळ करण्यासाठी कोणीही नाही, अशा वेळी बालकांना तात्पुरता निवारा देण्यात येईल. अथवा उपचारादरम्यान दोन्ही पालकांचा मृत्यु होवून, अनाथ झालेल्या बालकांना संपूर्ण संरक्षण, संगोपन व पुनर्वसन करण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय कृती दलाची आहे. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्कतेने आणि संवेदनशीलरित्या काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी दिल्या आहेत.

तिसऱ्या लाटेचा धोका घेता पालकांनी मुलांची काळजी घ्यावी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे लहान मुलांवर होणारे संभाव्य धोके लक्षात घेता आरोग्य यंत्रणेने शासकीय व खाजगी रुग्णालयांच्या समन्वयाने जिल्ह्यात लहान मुलांच्या अनुषंगाने कोविड केअर सेंटरर्स व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्सची निर्मिती करण्यात यावी. यासोबतच पालकांनी देखील आपली मुले या तिसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाला बळी पडणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच कोरोना नियमांचे काटेकोरपणे मुले पालन करतील याकडे पालकांनी अधिक लक्ष्य द्यावे त्यांना प्रशिक्षित करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी केले.

या संस्थाशी संपर्क करावा

कोरोनामध्ये ज्या बालकांचे मातृ व पितृ छत्र हरवले आहे, अशा बालकांची माहिती देण्यासाठी 24 तास कार्यरत असणारी चाईल्डलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे महिला व बालविकास विभागाची हेल्पलाईन क्रमांक 8308992222/ 7400015518, बाल कल्याण समिती नाशिक, 0253-2314598/ 9922616280, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नाशिक 0253-2236368, जिल्हा बाल संरक्षण कक्ष नाशिक 0253-2236294, समन्वय, जिल्हास्तरीय कृती दल 9762313156 (व्हॉटसॲप) या संपर्क क्रमांकांवर नागरीकांनी माहिती देण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे.

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी संस्था

  • जिल्ह्यातील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी आधाराश्रम संचलित शिशुगृह, घारपुरे घाट, अशोक स्तंभाजवळ, नाशिक येथील श्री. राहुल जाधव 9834837045/0253 -29503009,
  • 7 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी शेल्टर डॉन बॉस्को बॉम्बे सेल्शीअन सोसायटी प्लॉट नं. 7138, जी.डी. रोड नाशिक येथील बालगृह अधिक्षक श्री. रोशन गेन्सालवीस 8407993602/ 7517041011
  • 7 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींसाठी जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचालीत मुलींचे निरीक्षणगृह/ बालगृह उंटवाडी रोड, नाशिक अधिक्षीका सीमा जगदाळे 0253-2583598 / 9860200603
  • 18 ते 23 वर्षे वयोगटातील मुलींसाठी शासकीय मुलींचे अनुरक्षण गृह, बंगला नं. 5 वसंत बहार सोसा, त्रिकोणी गार्डनजवळ, काठे गल्ली, नाशिकच्या अधिक्षीका विनीता सोनगत 7744846591 या संस्थांशी संपर्क साधण्यात यावा.

अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती

व्हर्चुअल बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी मांढरे बोलत होते. या व्हर्चुअल बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायमूर्ती प्रसाद कुलकर्णी, नाशिक महानगरपालिकेच्या उपायुक्त अर्चना तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, मालेगाव महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त तुषार आहेर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र चौधरी, पोलीस निरीक्षक संगीता निकम, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा शुभांगी बेळगावकर, परिविक्षा अधिकारी योगीराज जाधव, चाईल्ड लाईन समन्वयक प्रविण आहेर, प्रणित तपकिरे, सुवर्णा वाघ आदी उपस्थित होते.

हेही वाचा - पंतप्रधान घेणार राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा; मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.