ETV Bharat / state

नाशिकमध्ये कोरोना रुग्णांत वाढ; खासगी रुग्णालयेही ताब्यात घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - nashik coron latets news

नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये कोरोनाला रोखण्यात यश आले आहे. मात्र, नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. हा उद्रेक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी स्वत: रस्त्यावर उतरल्याने प्रशासनातील इतर अधिकारी अधिक सक्रिय झाले आहे.

नाशिक जिल्हाधिकारी
नाशिक जिल्हाधिकारी
author img

By

Published : Apr 2, 2021, 5:18 PM IST

Updated : Apr 2, 2021, 7:41 PM IST

नाशिक - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांवर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यासोबत ग्रामीण रुग्णायातील बेडची संख्या वाढवण्याचे तसेच ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर पुरवठ्याबाबत नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. तसेच खासगी रुग्णालयांसह ट्रस्ट रुग्णालये ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

नाशिकमध्ये खासगी रुग्णालयेही ताब्यात घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटल आणि ट्रस्ट हॉस्पिटलही ताब्यात घेणार

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत काल (गुरुवार) नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हा रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी स्वतः जिल्हारुग्णालयातील वेगवेगळ्या वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली .याशिवाय रुग्णालयातील सोयी सुविधा आणि सेवांविषयी जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हा रुग्णालयात लवकरच अतिरिक्त १०० बेड उपलब्द करून दिले जातील ,जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या बघता जिल्ह्यातील खासगी रुग्णालये आणि ट्रस्ट रुग्णालयेही ताब्यात घेतले जातील, अशी माहिती मांढरे यांनी दिली आहे.

नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा उद्रेक

नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यामध्ये कोरोनाला रोखण्यात यश आले आहे. मात्र, नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गा उद्रेक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी स्वत: रस्त्यावर उतरल्याने प्रशासनातील इतर अधिकारी अधिक सक्रिय झाले आहे. कोरोनाचा झालेला उद्रेक रोखण्याचे मोठे आव्हान शासकिय यंत्रणांसमोर उभे आहे. मात्र, नागरिकांनी आता तरी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

हेही वाचा - पुण्यात रात्रीची संचारबंदी; जाणून घ्या काय बंद, काय सुरू

उपचारादरम्यान आक्सिजन पुरवठा खंडीत होणार नाही याबाबत दक्षता

ऑक्सिजनाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी संनियत्रण अधिकारी म्हणून काम पाहणारे डॉ.श्रीवास यांनी आक्सिजनची माहिती संकलनाबरोबरच खाजगी रुग्णालयांना भेटी देऊन सर्व रुग्णालयांमध्ये आक्सिजनचा वापर नियमाप्रमाणे होतो किंवा नाही याची खात्री करावी. आक्सिजन वाया जाणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाचा उपचारादरम्यान आक्सिजन पुरवठा खंडीत होणार नाही याबाबत दक्षता घेऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. तसेच जिल्ह्यात दौरे करुन ऑक्सिजन पुरवठ्याबाबत पुरेशी व्यवस्थेची तपासणी करण्याची सूचना देखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

रुग्ण वर्गीकरण विभागाची पाहाणी

ग्रामीण भागातील व्हेंटीलेटरचा सुयोग्य वापर करण्यात यावा. जिथे आवश्यकता आहे तिथे व्हेंटीलेटर ठेवून उर्वरीत व्हेंटीलेटर जे रुग्णालय वापरु शकते या ठिकाणी वर्ग करण्याबाबतचा कृती आराखडा तयार करण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात जिल्हा सामान्य रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्यात यावी. तसेच ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर बरोबर खासगी रुग्णालयदेखील अधिग्रहीत करण्यात यावे. कोरोना रुग्णांना तात्काळ उपचार होण्यासाठी एसएमबीटी, मविप्र रुग्णालये अधिग्रहीत करण्यात यावी. कोविड बाधित गर्भवती महिलांसाठी तयार करण्यात येणाऱ्या कक्षाला, तसेच नव्याने तयार करण्यात येणाऱ्या रुग्ण वर्गीकरण विभागाची जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या वेळी पाहणी केली आहे.

हेही वाचा - Corona Updates : कोरोना उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सची थोड्याच वेळात बैठक

Last Updated : Apr 2, 2021, 7:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.