ETV Bharat / state

नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून ट्रकचालकांना आर्सेनिक अल्बम-३० औषधाचे वाटप - nashik corona update

ट्रान्सपोर्ट व्यवसाय हा अत्यावश्यक सेवेत येत असल्याने कोरोनाच्या कालावधीत चालक तसेच ट्रान्सपोर्ट क्षेत्रात काम करणारे आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहे. त्या दृष्टीने नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाच्या कालावधीत निर्माण झालेल्या परिस्थितीत ट्रक चालक आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायात काम करणाऱ्यांसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

nashik news
distribution of medicine to truck driver at nashik
author img

By

Published : Jun 2, 2020, 6:34 PM IST

नाशिक - देशभरात कोरोना विषाणूचा (Covid-19) प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचा विषाणू हा रुग्णांच्या रोग प्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. यासाठी शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या आर्सेनिक अल्बम-३० या होमियोपॅथिक औषधाचे वाटप नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्यावतीने करण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड आणि उपाध्यक्ष महेंद्रसिंग राजपूत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या औषधांचे वाटप करण्यात आले.

ट्रान्सपोर्ट व्यवसाय हा अत्यावश्यक सेवेत येत असल्याने कोरोनाच्या कालावधीत चालक तसेच ट्रान्सपोर्ट क्षेत्रात काम करणारे आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहे. त्या दृष्टीने नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाच्या कालावधीत निर्माण झालेल्या परिस्थितीत ट्रक चालक आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायात काम करणाऱ्यांसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये ट्रकचालकांना अन्नधान्य तसेच प्राथमिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या आजारात शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या आर्सेनिक अल्बम-३० या होमियोपॅथिक औषधाच्या १ हजार बाटल्याचे वाटप करण्यात आले.

नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी ट्रक टर्मिनल येथे जाऊन चालकांना या औषधांचे वाटप केले. तसेच ट्रान्सपोर्ट व्यवसायात काम करणाऱ्या आणि सतत एकमेकांच्या संपर्कात येणाऱ्या कामगार, व्यावसायिकांना आणि कुटुंबीयांना या औषधाचे वाटप करण्यात आले. यासाठी औषधे उपलब्ध करून देण्यात जनकल्याण समिती नाशिक यांचे सहकार्य लाभले.

यावेळी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे विशाल पाठक, संजू राठी, दीपक ढिकले, अमोल शेळके, तेजपाल सिंग, संजू बोरा, गुरमेल सिंग, अमोल शिंदे यांच्यासह नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.