ETV Bharat / state

नाशकात 'डर्टी' पाणीपुरीचा भांडाफोड - खराब पाणीपुरी

सडलेले बटाटे, रंग मिश्रित चटणी, खराब तेल, दुर्गंधीयुक्त हरबरे आणि उघड्यावर पडलेल्या पुऱ्या यातून हा पदार्थ विक्रेता बनवत होता. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाकडून स्वच्छता अभियानाअंतर्गत पाहणी दौरा सुरू असताना हा किळसवाणा प्रकार आढळून आला.

panupuri
नाशकात 'डर्टी' पाणीपुरीचा भांडाफोड
author img

By

Published : Feb 8, 2020, 4:14 PM IST

Updated : Feb 8, 2020, 4:55 PM IST

नाशिक - पाणीपुरी म्हटले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सूटते. मात्र, शहरात याबाबत एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. ते बघून पाणीपुरी खाण्यापूर्वी तुम्ही नक्कीच पुन्हा एकदा विचार कराल.

नाशकात 'डर्टी' पाणीपुरीचा भांडाफोड

नाशिकच्या सातपूर परिसरातील बजरंग नगर परिसरात अत्यंत गलिच्छ पद्धतीने पाणीपुरी बनवल्या जात होती. सडलेले बटाटे, रंग मिश्रित चटणी, खराब तेल, दुर्गंधीयुक्त हरबरे आणि उघड्यावर पडलेल्या पुऱ्या यातून हा पदार्थ विक्रेता बनवत होता. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाकडून स्वच्छता अभियानाअंतर्गत पाहणी दौरा सुरू असताना हा किळसवाणा प्रकार आढळून आला.

हेही वाचा - शिरूरची झिरो एनर्जी शाळा म्हणजे चमत्कार, छत्तीसगडचे शिक्षकही झाले आवाक

मूळचा मध्य प्रदेशचा असलेल्या दिवान सिंग हा अशाप्रकारची पाणीपुरी विकत होता. त्याच्या घरातून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे सगळे गलिच्छ साहित्य जप्त करून नष्ट केले. शिवाय प्लास्टिकचा वापर आणि पाणीपुरीसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याप्रकरणी दिवान सिंगला ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

हेही वाचा - ' मी पंढरपूरला दर्शनाला जातो.. पण त्याचे राजकारण करत नाही'

पाणीपुरी हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. मात्र, पाणीपुरीच्या नावाखाली जर अशाप्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असेल, तर ही नक्कीच गंभीर बाब आहे. अशा घाणेरड्या पद्धतीने पाणीपुरी विक्रेत्यावर कारवाई व्हावी, अशी प्रतिक्रिया आता जनमाणसातून उमटत आहे. या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना अन्न व औषध प्रशासन झोपा काढतय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Intro:पाणीपुरी खात असाल तर सावधान.. असं सांगण्याची वेळ वारंवार येते. पाणीपुरी म्हंटल की अनेकांच्या तोंडाला पाणी सूटत मात्र नाशिकमध्ये या पाणीपुरीबाबत एक किळसवाणा प्रकार समोर आलाय. ते बघून पाणीपुरी खाण्यापूर्वी तुम्ही नक्कीच विचार कराल.. Body:सडलेले बटाटे, कलरमिश्रित चटणी, खराब तेल, दुर्गंधीयुक्त हरबरे, उघड्यावर पडलेल्या या पुऱ्या आणि पाणीपुरी तयार करण्याचे हे सर्व साहित्य जिथे ठेवण्यात आले होते ति ही जागा.. बुधवारी नाशिकच्या सातपूर परिसरातील बजरंग नगरच्या मळे परिसरात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाकडून स्वच्छता अभियानाअंतर्गत पाहणी दौरा सुरु होता आणि याच वेळी मूळच्या मध्य प्रदेशच्या असलेल्या दिवान सिंग या पाणीपुरी विकेत्याच्या घराजवळ हे पथक पोहोचले असता हा सर्व गलिच्छ प्रकार समोर आला.. पालिकेच्या कर्मचाऱ्यानी हे सर्व साहित्य जमा केले, रंगांपासून बनवलेल्या चटण्या त्यांनी नष्ट केल्या आणि अस्वच्छता, प्लास्टिकचा वापर तसेच पाणीपुरीसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्या प्रकरणी दिवानसिंगला ५ हजार रुपयांचा दंड ही ठोठावला.
Conclusion:पाणीपुरी हा खरं तर अनेकांच्या आवडीचा पदार्थ.. पाणीपुरीचे नाव जरी काढले तरी तोंडाला पाणी सूटत असते मात्र पाणीपुरीच्या नावाखाली जर अशाप्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असेल तर ही नक्कीच गंभीर बाब असून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे व्यक्त केलं जातंय....

अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न औषध विभाग कार्यरत असतो मात्र तो फक्त नावालाच असल्याच आजपर्यंत बघायला मिळालय.. एकीकडे नागरिकांच्या आरोग्याशी अशाप्रकारे खेळ सुरु असताना अन्न औषध प्रशासन झोपा काढतय का ? असा प्रश्न उपस्थित होतोय.

Last Updated : Feb 8, 2020, 4:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.