नाशिक - देशामध्ये कोरोना या विषाणु मुळे होणाऱ्या आजाराचा परीनाम जानवतो आहे. जास्तीत जास्त रंग व रंग खेळण्याचे साहित्य चीनमधून येते, त्यामुळे यावर्षी रंग न खेळण्याच्या प्रतिज्ञा विविध शैक्षणीक शाळा व संस्थामध्ये विद्यार्थ्यांनी स्वत: घेतल्या. यामुळे विद्यार्थी व शाळांचे कौतूक होत आहे.
नाशिक जिल्ह्यात व दिंडोरी तालुक्यात प्रामुख्याने रंगपंचमीला जास्तीत जास्त रंगांची उधळण होत असते. मात्र, यावर्षी कोरोना विषाणुमुळे रंगपंचमी किंवा धुलिवंदनला रंग न खेळण्याची प्रतिज्ञा घेऊन प्रत्येक शाळेने चांगला उपक्रम राबवला आहे .