ETV Bharat / state

सकाळी उठण्यावरून अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले... - उपमुख्यमंत्री अजित पवार

लहान-लहान मुले-मुली चांगल्या पद्धतीने शिकतात. यामध्ये मुलींची संख्या जास्त दिसते. मुलांचे मात्र लक्ष दुसरीकडे असते. त्यांनीही इकडे लक्ष द्यायला पाहिजे, असे पवार म्हणाले. तसेच सध्या बेरोजगारी वाढलेली आहे. आम्ही बऱ्याचशा सरकारी नोकरीच्या जागा भरण्याचा विचार करत आहोत. ८ हजार पोलिसांची भरती करणार आहोत, असेही अजित पवारांनी सांगितले.

ajit pawar addressed student nashik
उपमुख्यमंत्री अजित पवार
author img

By

Published : Jan 31, 2020, 10:28 AM IST

Updated : Jan 31, 2020, 10:37 AM IST

नाशिक - माझ्यामुळे तुम्हाला लवकर उठून यावे लागले. त्यामुळे मला माफ करा. मी सकाळी इतक्या लवकर येईल की नाही, अशी चर्चा होती. मात्र, एकजण म्हणाला की येतील, हे सकाळीच उठून शपथ घेत असतात, असे म्हणाताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील कादवा इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय या शाळेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

सकाळी उठण्यावरून अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले...

लहान-लहान मुले-मुली चांगल्या पद्धतीने शिकतात. यामध्ये मुलींची संख्या जास्त दिसते. मुलांचे मात्र लक्ष दुसरीकडे असते. त्यांनीही इकडे लक्ष द्यायला पाहिजे, असे पवार म्हणाले. तसेच सध्या बेरोजगारी वाढलेली आहे. आम्ही बऱ्याचशा सरकारी नोकरीच्या जागा भरण्याचा विचार करत आहोत. ८ हजार पोलिसांची भरती करणार आहोत. त्यानंतर कृषी, जलसंपदा, आरोग्य अशा अनेका खात्यांमध्ये आमचे सरकार भरती करणार आहे. काहींना तरी याद्वारे काम मिळेल. कौशल्य विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. टाटा टेक्नॉलॉजी आणि राज्य सरकार हा उपक्रम राबवणार आहे, असे त्यांनी सांगितले.

अनेक प्रकारच्या प्रलोभनांना मुले-मुली बळी पडतात. कोणी धुम्रपानासारख्या व्यसनांच्या आहारी जातात. परिणामी आरोग्याची हानी होते. त्यामुळे तुम्ही कुठल्याही व्यसनाला बळी पडू नका. आरोग्याची काळजी घेतली तर तुम्ही तंदुरुस्त राहाल. मन आणि शरीर निरोगी कसे राहील, याबाबत काळजी घ्या. आता कोरोना व्हायरस आला. त्यामुळे तुम्हीही काळजी घ्या, असेही ते विद्यार्थ्यांना म्हणाले.

चुकीच्या बातम्या समाजात पसरवण्याचे काम काहीजण करतात. मध्यंतरी बातमी आली होती की, माझा आणि अशोक चव्हाणांचा वाद झाला. मात्र, आमच्यामध्ये कसलाही वाद झाला नाही. त्यानंतर अशोक चव्हाण आणि छगन भुजबळ यांचा खुर्चीत बसण्यावरून वाद झाला. मात्र, मी स्वतः त्याठिकाणी उपस्थित होतो. असे काही झालेले नाही. हे सरकार टिकवण्यासाठी तिन्ही पक्षांचे प्रमुख जातीने लक्ष देत आहे. त्यामुळे इतर कोणी काहीही करू शकत नाही. त्यामुळे अशा बातम्या आल्या की कोणीतरी जाणीवपूर्वक चावटपणा करतोय असे समाजायचे, असे अजित पवार म्हणाले.

Intro:नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील कादवा इंग्लिश स्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय या शाळेच उद्घाटन सोहळा अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलाय. त्यावेळी अजित पवार यांनी भाषण केले त्यातील मुद्दे.

- माझ्यामुळे तुम्हाला लवकर उठवून यावं लागलं त्यामुळे माफ करा
- सकाळी इतक्या लवकर येईल की अशी चर्चा होती
- मात्र एक जण म्हणे हा बाबा सकाळी लवकर शपथ घेत असतो
- कार्यक्रमात एकच हशा पिकला
- पोलीस पाटलांच्या संघटनेबाबत लवकर महत्वाचा निर्णय घेईल, मुख्यमंत्री महोदयांना देखील भेटून निर्णय घेणार आहे
- कर्जमाफीच्या बाबतीत अर्थमंत्री म्हणून शेतकऱ्याला कुठलीही अडचण येऊ देणार आहे
- कर्ज फेडणाऱ्यांना देखील काहींना काही देण्याचा प्रयत्न असेल
- पोलीस पाटलांच्या थकीत मानधनाचा प्रश्न लवकर सोडवेल
- शिवभोजन थाळीची सुरुवात आहे
- नवीन योजना आहे, काही त्रुटी असतील
- मात्र त्या लक्षात आणून द्या सोडवू देऊ
- आत्ता कर्जमाफी केलीय
- पुढच्या वेळेला कमी व्याजी कर्ज देण्याचा प्रयत्न करू
- नाशिक जिल्हा बँकची काय अवस्था करून ठेवलीय
- चुकीचे लोक निवडणूक दिले म्हणून ही अवस्था
- बाजार समिती, बँक इतर संस्थांच्या ठिकाणी चांगलं माणसं निवडून द्या
- मराठी भाषा प्रत्येक माध्यमाच्या शाळेत बंधनकारक असणार
- मराठी भाषा प्रत्येकाला बोलता आली पाहिजे यासाठी हा प्रयत्न
- लवकर अर्थसंकल्प सादर करायचा आहे
- गोरगरीब जनतेसाठी, अल्पसंख्याक वर्ग अशा सर्व घटकांना मदत करायची
- देशात वेगवेगळ्या समस्या पुढे येताय
- CAA NRC बाबत काहीही विचार करू नका
- कारण नसताना गैरसमज करून घेऊ नका
- जो पर्यंत आम्ही महाराष्ट्रात आहे तोपर्यंत काळजी करू नका
- पश्चिम कडे ( गुजरात ) जे पाणी पडतंय ते पाणी वेगवेगळ्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न
- सध्या मंदी आहे, टॅक्सच्या रूपाने येणार पैसा कमी आहे
- अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे
- कांद्याचे भाव वाढले की काही लोकांच्या काय मनात येत कळत नाही
- द्राक्ष,कांदा, गहू ही पिके संकटात आहे
- मोबाईल वापरण्याचं प्रमाण वाढलं
- अभ्यासात मुलींची संख्या जास्त असते
- मुलांच मात्र लक्ष दुसरीकडे असतं
- त्यांनीही इकडे लक्ष द्यायला पाहिजे
- कौशल्य विकासाच काम ही हाती घेतलय
- सर्व आयटीआय चं इन्फ्रास्ट्रक्चर राबवणार
- स्किल लेबर पुढे आले पाहिजे त्यासाठी प्रयत्न आहे
- व्यसनांच्या बळी जाऊ नका
- सिगारेट, तंबाखू व्यसनांना बळी पडू नका
- रोगाला बळी पडावं लागतं
- अलीकडे मैदान कमी होत चालले
- खुप व्यायाम करा, खूप खेळा
- नीट राहा आणि फिट राहा
- अजित दादांचा विद्यार्थ्यांना सल्ला
- नवीन आजार आलाय, कोरोना आजार आलाय काळजी घ्या
- प्रत्येक विद्यार्थ्यांना वाढदिवसाला एक झाड लावा
- पाऊस पाणी चांगला होतो, समाजाला ही फायदा होतो
- चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नको
- माझं आणि अशोक चव्हाण यांच भांडण झाले असे दाखवलं
- हे सरकार टिकवण्यासाठी शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे लक्ष ठेऊन आहे
- अशा चुकीच्या बातम्या आल्या तर कुणीतरी चावटपणा केला आहे असं समजा
- तुम्हाला आज लवकर उठाव लागलं त्यामुळे माफ करा
- आमचे आमदार दिलीप बनकर ही उशिरा आले पण आले
- काही लोक सूर्यमुखी असतात, सूर्य उगवल्याशिवाय उठत नाही
- राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांना कोपरखळी
- मला कुंकू ची ऍलर्जी आहे, म्हणून मी ओवाळतांना लावला नाही
- उपमुख्यमंत्री झाला म्हणून मोठा झाला का असा गैरसमज करू नकाBody:..Conclusion:..
Last Updated : Jan 31, 2020, 10:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.