नाशिक - त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात पणती पौर्णिमा नाशिकमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. या दिवशी नाशिक गंगापूर गावातील श्री व्यंकटेश बालाजी मंदिरात लाखो पणत्या प्रज्वलित करून हा दीपोत्सव साजरा केला जातो. यानिमित्त मंदिरातील बालाजीच्या मूर्तीभोवती आकर्षक पंत्यांची आरास करण्यात आली होती. यावेळी लक्ष लक्ष दिव्यांनी श्री व्यंकटेश बालाजी मंदिर उजळून निघाले होते.
मंदिरात स्थापनेपासून येथे अखंड समयी तेजवत आहे. याच समईच्या ज्योतीने लक्ष लक्ष पणत्या प्रजवली करण्यात आल्या. मंदिराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. बालाजीच्या दर्शनासाठी व पणत्या प्रज्वलित करण्यासाठी नाशिककरांनी लाखोच्या संख्येने गर्दी केली होती. दहा वर्षापासून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पहिल्या वर्षी फक्त अकराशे पणत्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, आता दहा वर्षानंतर ही संख्या लाखोवर गेली आहे. या उत्सवामध्ये महिलांसह बाळगोपाळ वयोवृद्ध नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी कुठला ही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त देखील येथे तैनात करण्यात आला होता.