ETV Bharat / state

Nashik News : नाशिक जिल्हा रुग्णालयात मृत व्यक्ती झाला जिवंत - ECG report flat

नाशिक जिल्हा रुग्णालयात भाजलेला रुग्ण दाखल झाला होता. उपचारादरम्यान इसीजी केल्यानंतर रुग्णाच्या हृदयाची धडधड बंद झाल्याने डॉक्टराने त्याला मृत घोषित केले. मात्र, काही वेळानंतर या रुग्णाची हालचाल दिसून आल्यानंतर तो जिवंत असल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर रुग्णांनी डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले.

Nashik News
Nashik News
author img

By

Published : May 26, 2023, 5:08 PM IST

नाशिक : रुग्णाचा इसीजी केल्यानंतर कागदावरील सरळ रेषा म्हणजे रुग्णाच्या हृदयाची धडधड बंद झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय दृष्ट्या सांगितले जाते. त्यामुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. गुरुवारी नाशिक जिल्हा रुग्णालयातील इसीजी रिपोर्टवरून मृत ठरवलेला रुग्णवर आणि नातेवाईकांवर अशीच वेळ आली होती. मात्र, काही वेळानंतर रुग्ण जिवंत असल्याचे लक्षात आल्याचा प्रकार समोर आल्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता.

इसीजी रिपोर्ट फ्लॅट : सोमवार दिनांक 22 मे रोजी नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरातील एका व्यावसायिकाने स्वतःला पेटून घेतल्याची घटना घडली होती. यात तो 93 टक्के भाजला होता. त्याला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. गुरुवारी त्याच्यावर उपचार सुरू असताना सकाळी सहा वाजेच्या सुमारास रुग्णाची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्यामुळे वार्डमध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थी डॉक्टरने वैद्यकीय तपासणी केली. रुग्णाचा इसीजी रिपोर्ट फ्लॅट असल्याने डाॅक्टरांनी नातेवाईकांना रुग्णाचे निधन झाल्याचे सांगितले. यामुळे नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

मृत रुग्णाच्या पायाची मंद हालचाल : याबाबत रुग्णालयाच्या डाॅक्टरांनी पोलीस चौकीत रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे पोलिसांनी ही पुढील प्रक्रिया सुरू केली. मात्र, दोन तासानंतर सकाळी आठच्या सुमारास वार्डमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यास मृत रुग्णाच्या पायाची मंद हालचाल होत असल्याचे दिसल्याने त्यांनी रुग्णाची पुन्हा तपासणी केली. त्यात रु हृदयाचे ठोके आल्याने रुग्ण जिवंत असल्याचे स्पष्ट झाले.

नातेवाईकांनी डाॅक्टरांना धरले धारेवर : ही बाब समजतात डॉक्टरांनी तातडीने रुग्णावर उपचार सुरू केले. तसेच रुग्ण जिवंत असल्याची माहिती पुन्हा नातेवाईकांना देण्यात आली. त्यामुळे नातेवाईकांना आनंद झाला. मात्र, डॉक्टरने आधी चुकीची माहिती दिल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी उपस्थित पोलिस तसेच वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने नातेवाईकांची समजूत काढली. दरम्यान गुरूवारी रात्री पुन्हा रुग्णाच्या हृदयाचे ठोके बंद पडल्याने त्यास मृत घोषित करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.