ETV Bharat / state

आपटेपाडा-दरा शिवारातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी करावा लागतो जीवघेणा प्रवास - आपटेपाडा आणि दरा शिवार

गावापासून वस्तीचा संपर्क तुटल्याने नागरिकांना शिक्षणासाठी आणि दळणवळणासाठी जिवघेणा प्रवास करावा लागत आहे.

जीवघेणा प्रवास
author img

By

Published : Sep 25, 2019, 6:49 AM IST

नाशिक - सटाणा तालुक्यातील पठावे दिगर येथील आपटेपाडा आणि दरा शिवारातील जवळपास तीनशे नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला आहे. यामुळे येथील तीस ते चाळीस शालेय विद्यार्थी देखील शिक्षणापासून वंचित राहत आहेत. दरम्यान, नदीचे पाणी काही प्रमाणात कमी झाल्यानंतर बंधाऱ्यावरून दोराच्या आधारने जीवघेणा प्रवास करून या विद्यार्थांना शाळेत यावे लागत आहे.

शिक्षणासाठी करावा लागणारा जीवघेणा प्रवास

विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आणि ग्रामस्थांना गावात येण्यासाठी हत्ती नदीवर गाडघोसर शिवारतील बांधलेल्या केटिवेअर बंधाऱ्याचा वापर करावा लागतो. मात्र, बंधाऱ्यावरून जास्त प्रमाणात पाणी वाहत असल्यास नागरिकांना तासनतास पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागते. दरम्यान, हा असा प्रवास करावा लागत असल्याने स्थानिकांना मागिल दोन महिन्यांपासून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांना महिनाभर शाळेला सुटी ध्यावी लागत आहे.

हेही वाचा - ईडीच्या माध्यमातून जे केले जाते ते अत्यंत दुर्दैवी - हेमंत टकले

पठावे दिगर परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगर दऱ्या आणि जंगल आहे. यामुळे या भागात पाऊसही जास्त प्रमाणात पडतो. दरम्यान, हत्ती नदीचा प्रवाह इतका जोरदार आहे, की एके काळी या नदीतील प्रवाहात एक हत्ती वाहून गेल्याची दंतकथा येथे प्रसिद्ध आहे. यामुळेच या नदिला हत्ती नदी असे नाव पडले आहे. दरम्यान, या नदीला पार करतांना अनेक अपघात झालेत. मात्र, तरीही नाईलाजाने नागरिकांना हा जिवघेणा प्रवास करावा लागतो. निदान आता तरी प्रशासनाने या प्रश्नाचा गांभिर्याने विचार करुन येथे पूल बांधावा अशी नागरिकांची मागणी आहे.

हेही वाचा - फुकटच्या सल्ल्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचे तावडेंना प्रत्युत्तर

Intro:नाशिक:-सटाणा तालुक्यातील पठावे दिगर येथील आपटेपाडा आणि दरा शिवारातील जवळपास
तीनशे नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला असून त्याचबरोबर.तेथील तीस ते चाळीस शालेय विद्यार्थी देखील शिक्षणापासून वंचित राहत आहेत. तर नदीचे पाणी काही प्रमाणात कमी झाल्यानंतर बंधायावरून दोराच्या आधारने चढ उतर करत जीवघेणा प्रवास करून शाळेत यावे लागत आहे.Body:विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आणि ग्रामस्थां गावात येण्यासाठी हत्ती नदीवर गाडघोसर शिवारतील बांधलेल्या केटिवेअर बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंना दोरखंडबांधले असून त्यावरून एका बाजूने उतरून बंधाऱ्यावरून उड्या घेत पुन्हा दुसऱ्याबाजूने दोरखंडाच्या सहाय्याने नदी पार करावी लागते. तसेच जर बंधाऱ्यावरून जास्त प्रमाणात पाणी वाहत असल्यास तासनतास पाणी कमी होण्याची वाट पाहून, पाणी कमी झाल्यानंतरच नदी पार करावी लागत असल्यामुळे.स्थानिकांना गेल्या दोन महिन्यापासून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांना महिनाभर शाळेला सुटी घ्यावी लागत आहे..Conclusion: पठावे दिगर परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगर दऱ्या आणि जंगल असून पाऊस ही जास्त प्रमाणात पडतो. हत्ती नदीचा प्रवाह इतका जोरदार आहे की एके काळी या नदीने एका हत्तीला वाहून नेले होते त्यामुळे या नदिला हत्ती नदी नाव पडले असून नदीचा प्रवाह प्रचंड वेगात वाहतो या प्रवाहाचा सामना करीत येथील नागरिक विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतातअनेक वर्षापासून अनेकदा अपघातही घडले आहेत मात्र प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची पावले उचलली जात नाहीत असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले...

स्थानिक नागरिक बाईट:-1.2..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.