नाशिक - जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात दुपारी चारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या अचानक झालेल्या पावसामुळे मेथी, कोथिंबीर, वांगे, बाजरी भोपळा बाग, कारले या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दिंडोरी तालुक्यातील जोरण, लहाणीवणी, पिंपळगाव धुम, निगडोळ, नरवाडपाडा , ढेपण पाडा जोरणपाडा , साद्राडे,निचाईपाडा शिवरपाडा , कवडासर , चारोसे, या परीसरात जोरदार पाभस झाला. अचानक आलेल्या पावसने सगळ्यांची धांदल उडाली. या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.