ETV Bharat / state

नाशिक : मनपाच्या आरोग्य भरतीत कोरोनाचा पडला विसर; इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी

author img

By

Published : Mar 23, 2021, 7:35 PM IST

नाशिक जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे नाशिक शहरात आढळून येत असल्याने महानगरपालिका प्रशासन अ‌‌ॅक्शन मोडवर आले आहे. 3 महिन्याच्या कालावधीसाठी मानधनावर आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया महानगरपालिकेच्या मुख्य इमारत असलेल्या राजीव गांधी भवन येथे पार पडत आहे.

crowd at nashik mnc health department exam centre during covid crisis
इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी

नाशिक - महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर भरती प्रक्रिया रावबली. मात्र, या भरती दरम्यान झालेल्या गर्दीमुळे महानगरपालिकेलाच कोरोनाचा विसर पडला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गर्दीची दृश्ये.

नाशिक जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे नाशिक शहरात आढळून येत असल्याने महानगरपालिका प्रशासन अ‌‌ॅक्शन मोडवर आले आहे. 3 महिन्याच्या कालावधीसाठी मानधनावर आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया महानगरपालिकेच्या मुख्य इमारत असलेल्या राजीव गांधी भवन येथे पार पडत आहे. मात्र, या भरती प्रक्रियेदरम्यान इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याने भरती प्रक्रिया दरम्यान फज्जा उडाला. यावेळी महानगरपालिकेच्या पार्किंग भागात मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. एकीकडे महानगरपालिका गर्दी होणाऱ्या कार्यक्रमावर कारवाई करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकेच्या कार्यालयातच झालेली गर्दी बघून नागरिकांना प्रश्न पडला आहे.

हेही वाचा - येवल्यातील कुसमाडी येथे माणसाप्रमाणे घोड्याचा दशक्रिया विधी....

आरोग्य विभागाच्या 209 जागांसाठी भरतीप्रक्रिया पुढीलप्रमाणे -

  • एमडी मायक्रोबायोलॉजी जागा 1
  • वैद्यकीय अधिकारी जागा 25
  • आयुष्य वैद्यकीय अधिकारी जागा 30
  • एमएस्सी मायक्रोबायोलॉजी जागा 25
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ जागा 30
  • स्टाफ नर्स जागा 50
  • एएनएम जागा 60
  • डाटा एन्ट्री ऑपरेटर जागा 7
  • एकूण 209

हेही वाचा - कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकांची तुडुंब गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.