ETV Bharat / state

बालगाण परिसरात अवकाळी पाऊस, शेती पिकांचे नुकसान

संकटांची मालिका शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याने शेतकरी पुरता धास्तावला आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे. ग्राहकांपर्यंत शेतीमाल पोहचवण्यात प्रचंड अडचणी येत असल्याने मोठे नुकसान होत आहे. बहुतेक शेतकऱ्यांवर तयार माल फेकून देण्याची वेळ आली आहे.

heavy rain
बालगाण परिसरात अवकाळी पाऊस
author img

By

Published : May 11, 2020, 10:30 AM IST

सटाणा (नाशिक) - बागलाण तालुक्यातील अंतपूर, मुल्हेर, जायखेडा व परिसरातील बहुतांशी भागात रविवारी संध्याकाळी वादळ व विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. तर, काही ठिकाणी गाराही पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. ढगाळ हवामान आणी पावसाचे वातावरण पाहता अजून पावसाची शक्यता वाढल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

संकटांची मालिका शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याने शेतकरी पुरता धास्तावला आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे. ग्राहकांपर्यंत शेतीमाल पोहचवण्यात प्रचंड अडचणी येत असल्याने मोठे नुकसान होत आहे. बहुतेक शेतकऱ्यांवर तयार माल फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यातच अचानक झालेल्या वातावरणातील प्रतिकूल बदलामुळे व पावसामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे असाह्य उकाडा होत असून नागरिक हैराण झाले आहेत.

आधीच दृष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर पुन्हा आसमानी संकट आहे. या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे. विविध अडचणींवर मात करीत पिकवलेला कांदा काढणीचे काम सध्या वेगात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच काढून पडला आहे. रविवारी अचानक वातावरणात बदल होऊन पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा प्लास्टिकच्या कागदांनी झाकून पाण्यापासून वाचवण्याचा शेतकरी प्रयत्न करत आहे. तर अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कांदे भिजल्याने नुकसान झाले आहे. पावसाचे वातावरण पाहता अजून पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस आल्यास कांदा भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. हे टाळण्यासाठी मजुरांना जास्तीचे पैसे देवून कांदा चाळीत टाकण्याची धडपड शेतकरी करत आहे. माञ, मजुरांच्या कमतरतेमुळे अडचणी येत आहेत. त्यातच पाऊस झाल्यास हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.