ETV Bharat / state

नाशिकमध्ये वाढतेय गुन्हेगारी; पोलीस प्रशासनही बदनाम - नाशिक पोलीस विभाग

मागील आठ दिवसात वेगवेगळ्या घटनांनी नाशिक शहर हादरून गेले आहे. शहरात गुन्हे घडत असताना पोलीस नेमके काय करत आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नाशिकमध्ये गुन्हे वाढले
नाशिकमध्ये गुन्हे वाढले
author img

By

Published : Dec 14, 2019, 10:29 AM IST

नाशिक - शहरातील गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. मागील आठ दिवसात वेगवेगळ्या घटनांनी नाशिक शहर हादरून गेले आहे. शहरात गुन्हे घडत असताना पोलीस नेमके काय करत आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नाशिकमध्ये नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर

नाशिक शहरात खून, घरफोडी, एटीएम फोडण्याचा प्रयत्न, मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरी, अपहरण, मोटारसायकल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. एकीकडे जिल्ह्यात या घटना घडत आहेत. तर या दरम्यान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडले. यामुळे पोलीस यंत्रणा काय करत आहे? त्यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही, असा संभ्रम नाशिककरांना पडला आहे.

हेही वाचा - नवा नागरिकत्व कायदा महाराष्ट्रात लागू होणार का? मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

वरिष्ठ पोलीस अधिकारी मात्र पोलीस कर्मचारी योग्य पद्धतीने कारवाई करत असल्याचा दावा करत आहेत. काही गुन्ह्यांमध्ये वाढ होत असली, तरी इतर काही गुन्हे कमी करण्यात पोलिसांना यश आल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे म्हणने आहे.

Intro:नाशिक शहरातील गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. गेल्या आठ दिवसांतील घटनांनी नाशिक शहर हादरून गेलंय. शहरात गुन्हे घडत असतांना पोलीस नेमकं काय करताय असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.Body:नाशिक शहरात आठ दिवसांमध्ये घडलेल्या गुन्ह्यांनी नाशिक शहर हादरून गेलंय. खून, घरफोडी, एटीएम फोडण्याचा प्रयत्न, मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरी, अपहरण, मोटारसायकल चोरीच्या घटना अचानक वाढल्याय. त्यात अंबड आणि पंचवटीत प्रेमप्रकरणातून खून, पंचवटीतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न, गंगापूर रोडवरील मोबाईल दुकान फोडून लाखोंचे मोबाईल चोरी, विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा घरफोड्या, अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कारांसह घरफोडी आणि चैनस्नाचिंगच्या घटना तर नित्याचाच झाल्याय. अशा घटना घडत असतांना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात सापडताय. त्यामुळे शहरात पोलीस नेमकं काय करताय असा सवाल नाशिककर उपस्थित करताय.

बाईट - सुवर्णा पगार - नागरिक
बाईट - कुशल बर्वे - नागरिक
Conclusion:वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मात्र पोलीस कर्मचारी योग्य पद्धतीने कारवाई करत असल्याचा दावा करताय. काही गुन्ह्यांची वाढ होत असली तरी इतर बऱ्याच गुन्ह्यांत घट करण्यात पोलीसांना यश आल्याचे पोलीस आयुक्त सांगताय. शहरात गुन्ह्यांची होणारी वाढ लवकरच कमी होईल असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांना आहे.

बाईट - विश्वास नांगरे पाटील - पोलीस आयुक्त, नाशिक शहर

दरम्यान शहरात आठवड्याच्या घटना पाहता कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. त्यात काही पोलीस अधिकाऱ्यांच्या लाचखोरीच्या प्रकरणांनी पोलीस प्रशासन बदनाम झालंय. येत्या काळात घडलेल्या गुन्ह्यांची उकल आणि गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी शहर पोलीस प्रमुख याकडे गांभीर्याने लक्ष देऊन, नाशिक सुरक्षित करतील अशी मोठी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त केली जातेय.

टिप : - तीन बाईट एकत्र पाठवल्या आहेत...
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.