नाशिक - नाशिक राेड मध्यवर्ती कारागृहात खळबळजनक प्रकार समाेर आला आहे. शिक्षा भाेगणाऱ्या कैद्यांकडून लाखाे रुपये घेत त्यांना पॅराेल मंजूर करण्यासह रेकाॅर्डवरील शिक्षा कमी करणाऱ्या दाेन तुरुंगाधिकाऱ्यांसह एका लिपिकावर नाशिक राेड पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच कैदींना बेकायदेशीरपणे कारागृहातून सोडले असल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.
गुन्हा दाखल - दाेन तुरुंगाधिकारी व लिपिक शिक्षा भाेगणाऱ्या कैदी व त्यांच्या नातलगांकडून लाखाे रुपये लाच घेऊन कैद्यांच्या शिक्षा कमी करुन त्यांना तात्पुरत्या स्वरुपात कागदाेपत्री व्हाइटनर लावून खाडाखाेड करुन मुक्त किंवा शिक्षा कमी करत हाेते. सन २०१७ मध्ये नाशिकरोड कारागृहात कार्यरत तुरुंगाधिकारी श्यामराव अश्रुबा गीते, माधव कामाजी खैरगे व वरिष्ठ लिपिक सुरेश जयराम डबेराव यांनी कारागृहात शिक्षाबंदी असलेल्या तीन कैद्यांना त्यांच्या शिक्षेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पैसे व लाच घेऊन कारागृहातून बेकायदेशीरपणे सोडले. ही बाब कारागृह प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर कारागृह महासंचालकांनी अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात दोषी असल्याचे निष्पन्न झाल्या नंतर तुरुंगाधिकारी सतिष गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक मनतोडे करत आहेत.
हेही वाचा - Today Petrol- Diesel Rates : इंधन दर! पेट्रोल-डिझेल दरात वाढ कायम; वाचा नवे दर