ETV Bharat / state

'भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेले कोविड सेंटर इतर संस्थांना प्रेरणादायी ठरेल'

कोरोना रुग्णांसाठी वैशिष्ट्यपूर्ण व नावीन्यपूर्ण अशा ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ नॉलेज सिटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिकमध्ये तयार केले आहे. विभागीय क्रिडा संकुल येथे तयार झालेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १८० ऑक्सिजन व ११५ सीसीसी अशा एकूण २९५ बेडची व्यवस्था आहे.

covid-center-created-by-bhujbal-knowledge-city-will-be-inspiration-to-other-organizations-said-sharad-pawar
'भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेले कोविड सेंटर इतर संस्थांना प्रेरणादायी ठरेल'
author img

By

Published : Apr 18, 2021, 5:12 PM IST

नाशिक - नाशिकमधील आतापर्यंतचा सर्वात मोठे कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. या कोविड सेंटरचे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. अत्यंत कमी कालावधीत हे कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये २९५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच तब्बल १८० ऑक्सिजन बेडचीदेखील व्यवस्था करण्यात आल्याने नाशिकमधील कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. भुजबळांनी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तूत्य उपक्रम असून हे कोविड केअर सेंटर राज्यातील इतर संस्थाना कोरोनाच्या लढाईत काम करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया

रुग्णालयात २९५ बेडची व्यवस्था -

कोरोना रुग्णांसाठी वैशिष्ट्यपूर्ण व नावीन्यपूर्ण अशा ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ नॉलेज सिटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिकमध्ये तयार केले आहे. विभागीय क्रिडा संकुल येथे तयार झालेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १८० ऑक्सिजन व ११५ सीसीसी अशा एकूण २९५ बेडची व्यवस्था आहे.

संकटग्रस्त रुग्णांना मोठा आधार मिळेल -

स्वयंसेवी संस्थानी आजवर तयार केलेले कोविड सेंटर विलगिकीरण व्यवस्था म्हणून तयार करण्यात येत होते. मात्र, छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता असलेले नावीन्यपूर्ण कोविड सेंटर उभे राहत आहे. या कोविड केअर सेंटरमधून संकटग्रस्त रुग्णांना मदतीसाठी मोठा आधार मिळेल, असे पवार यांनी यावेळी सांगितले. कोविडचे मोठे संकट देशावर आणि राज्यवार असून यातून बाहेर पडण्यासाठी सर्व संस्था संघटनाची मदत आवश्यक असून त्यांनी यामध्ये पुढे येण्याची आवश्यकता आहे. नाशिकमध्ये भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेल्या कोविड सेंटरचा आदर्श घेऊन राज्यात इतर ठिकाणी देखील शक्य असेल तेवढे कोविड सेंटर निर्माण करण्यात यावे, असे आवाहन करत राज्यातील सहकारी आणि स्वयंसेवी विविध संस्था या नाशिकमधील या कोविड सेंटरची प्रेरणा घेतील, असेही त्यांनी म्हटले.

इतर रुग्णालयांवरील ताण कमी होणार -

कोरोनाचे मोठे संकट आपल्यासमोर उभे राहिले असून राज्यातील उद्योजक, साखर कारखानदार, शैक्षणिक संस्था, समाजसेवी संस्थांनी कोरोनाच्या लढाईत योगदान द्यावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. २९५ बेडची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे इतर रुग्णालयांवरील ताण कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - IPL २०२१ Points Table : मुंबईची गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप; जाणून घ्या इतर संघाची स्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.