ETV Bharat / state

टाळेबंदीतही मालेगावमध्ये कापूस केंद्र सुरू; 26  हजार 837 क्विंटलची खरेदी - मालेगाव कापूस खरेदी केंद्र न्यूज

पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव मिळवून देण्यासाठी मालेगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या जिल्ह्यातील एकमेव कापूस खरेदी केंद्राच्या माध्यमातून ६६ हजार ४६७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिली आहे.

संग्रहित - कापूस खरेदी केंद्र
संग्रहित - कापूस खरेदी केंद्र
author img

By

Published : Jul 28, 2020, 2:59 PM IST

नाशिक – टाळेबंदीतही मालेगाव येथील कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवण्यात आल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या केंद्रावरून कोरोनाच्या संकटातही ७०८ शेतकऱ्यांकडून २६ हजार ८३७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव मिळवून देण्यासाठी मालेगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या जिल्ह्यातील एकमेव कापूस खरेदी केंद्राच्या माध्यमातून ६६ हजार ४६७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिली आहे.
खासगी व्यापारांकडून कमी दराने कापूस खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव मिळत नाही. हे टाळण्यासाठी सरकारने मालेगाव येथील युनायटेड कॉटन एक्सट्रॅाट लिमिटेड (चाळीसगाव फाटा) येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भावात जवळच्या अंतरावर कापूस विक्री करण्यासाठी सोय झाली आहे. या कापूस खरेदी केंद्राचा मालेगाव, नांदगाव आणि येवला तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे जिल्हा उपनिबंधक बलसाने यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळातही कापूस खरेदी

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावापूर्वी १ हजार २२१ शेतकऱ्यांकडून ३९ हजार ६३० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. कोरोनाच्या संकटातही ७०८ शेतकऱ्यांकडून २६ हजार ८३७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. अशी एकूण १ हजार ९२९ शेतकऱ्यांकडून ६६ हजार ४६७ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला प्रतवारीनुसार हमी भाव दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कापसाच्या गाठी तयार करणार!
कापूस खरेदीसाठी एकूण १ हजार ३६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर १३९ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे अजून शिल्लक आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कापसावर कापूस खरेदी केंद्राच्या माध्यमातून प्रक्रिया करुन त्याच्या गाठी तयार केल्या जात असल्याची माहिती बलसाने यांनी दिली. उर्वरीत शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आणण्याचे आवाहन त्यांनी केले. कापूस खरेदी केंद्रात आजही कापसाची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे मालेगाव, नांदगाव आणि येवला तालुक्यातील शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे, आवाहनही उपनिबंधक गौतम बलसाने यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.