मालेगाव (नाशिक) : मालेगाव शहरात ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्या ठिकाणचा परिसर 'कंटेंनमेंट झोन' म्हणून घोषीत करण्यात आलेला आहे. असे असतानाही आणि लॉकडाऊन सुरु असताना देखील त्या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. ही बाब जेव्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि कायद्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी कालच नेमणूक करण्यात आलेले घटना व्यवस्थापक आणि प्रमुख समन्वयक पंकज आशिया यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी मालेगाव शहर आणि कॅम्प भागाची जबाबदारी असलेल्या दोन पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना या नोटिसा बजावल्या आहेत.
हेही वाचा... 'ती' बातमी साफ खोटी, कोरोनामुळे राज्याचे जिल्हानिहाय 'झोन' केलेले नाहीत - विश्वजीत कदम
या नोटिसीत संचारबंदी लागू असूनही मालेगावातील काही भागात गर्दी अद्यापही का दिसते, अशी विचारणा केली आहे. तसेच संचारबंदी असलेल्या भागात एकही नागरिक संचार करणार नाही, याची दक्षता घ्यावी. कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी असताना कर्तव्यात हलगर्जीपणा करू नये, अन्यथा शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा... कोरोनासाठी 'या' थेरपीचा उपयोग... 3 ते 7 दिवसांत रुग्ण होतो बरा