ETV Bharat / state

दिलासादायक..! जिल्ह्यातील 106 संशयितांची कोरोना चाचणी निगेटिव्ह - corona test of 106 suspects in the NASHIK district was negative

जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिकमधील ५, जाकीर हुसेन रुग्णालय ३ व खासगी रुग्णालयातील १ अशा ९ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गेल्या दोन दिवसात अतिजोखमीच्या संपर्कातील २७५ संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.

corona test of 106 suspects in the NASHIK district was negative
दिलासादायक..! जिल्ह्यातील 106 संशयितांची कोरोना चाचणी निगेटिव्ह तर मालेगावातील 97 जणांची
author img

By

Published : Apr 22, 2020, 11:25 PM IST

नाशिक - आज जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार एकूण १०६ कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या अहवालानुसार मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील ९७ कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मालेगावकरांना दिलासा मिळाला आहे. ही माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक मधील ५, जाकीर हुसेन रुग्णालय ३ व खासगी रुग्णालयातील १ अशा ९ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गेल्या दोन दिवसात अतिजोखमीच्या संपर्कातील २७५ संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर मालेगाव येथे उपचार घेत असलेल्या १० रुग्णांचे पहिले अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे हे १० रुग्ण येणाऱ्या काही दिवसातच बरे होऊन दवाखान्याबाहेर पडणार आहेत. या आजाराबाबत तातडीने प्रशासनास अथवा आरोग्य विभागास माहिती दिली तर वेळेत उपचार मिळाल्याने रुग्ण निश्‍चितपणे बरे होऊ शकतात, याची उमेद या १० रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे निर्माण झाली आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.