मनमाड (नाशिक) - राज्यसरकारतर्फे 9 वी ते 12 वीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने शिक्षकांची कोविड चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या शिक्षकांना उपचार केल्यानंतर कामावर रुजू करून घेण्यात येईल, असे आदेशच राज्य सरकारने दिले आहेत.
हेही वाचा - जालन्यातील सीताफळांना दिल्लीत मिळतोय चौपट भाव; "विकेल ते पिकेल" धोरणाचा झाला फायदा
राज्य शासनाने गेल्या सोमवारी धार्मिक स्थळे खुली केल्यानंतर आता या सोमवार पासून शिक्षणाचे मंदिर मानले जाणाऱ्या शाळा सुरू केल्या जात आहेत. शाळा सुरू होण्याअगोदर सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी केली जाणार असून मनमाडच्या सेंट झेवियर हायस्कूल येथील कोविड सेंटरवर कोरोना चाचणीसाठी आज शाळा-महाविद्यालयांच्या शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व शिक्षकांना कोविड 19 ची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. यामुळे नक्कीच फायदा होणार असून शिक्षकही स्वयंस्फूर्तीने ही चाचणी करून घेत आहेत. तसेच, ते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीही उत्सुक आहेत.
हेही वाचा - फुकट मिळालेल्या सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, चंद्रकांत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया