नाशिक - नाशिक शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशातच आता नाशिक महानगरपालिका मुख्यालयातील २८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे संपूर्ण शहरासह प्रशासकीय यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
नाशिक शहर कोरोनाचा हॉटस्पॉट
नाशिक जिल्ह्यातील इतर भागांच्या तुलनेत आता नाशिक शहर कोरोनाचा सर्वाधिक मोठा हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहे. नाशिक शहरात हजारोंच्या संख्येने दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. आता नाशिक महानगरपालिका मुख्यालयातील २८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल आहे. त्यामुळे नाशिक शहर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक कोरोना रुग्ण
देशातील सर्वाधिक १० कोरोनाग्रस्त शहरांच्या यादीत नाशिकचा समावेश झाला आहे. आता फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांमध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सलग चौथ्या दिवशी दोन हजारांहून अधिक बाधित रुग्ण आढळून आले होते. यातील सर्वाधिक बाधित हे नाशिक शहरातील होते. यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन सातत्याने प्रशासन करत आहे. मात्र तरीही नागरिक नियमांचे उल्लंघन करताना आढळून येत आहे. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच मोठा आवाहन आता प्रशासकीय यंत्रणां समोर उभे ठाकले आहे.
सद्यस्थितीत इतक्या रुग्णांवर उपचार सुरू
जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिलेल्या माहीतीनुसार जिल्ह्यातील १ लाख २९ हजार २ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत १६ हजार ९१६ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार २२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा-मुंबई : महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली, मुंबईतील अनेक चित्रपटगृहात अँटिजेन टेस्टच होत नाहीत
हेही वाचा-देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढविली