ETV Bharat / state

नाशिक : कोरोनामुळे औद्योगिक क्षेत्राला आर्थिक मंदीचा फटका.. चार लाख कामगारांच्या वेतनाचा प्रश्न - lockdown

कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला असून याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. नाशिकमध्ये औद्योगिक क्षेत्रात लहान मोठ्या वेगवेगळ्या 3 हजार कंपन्या असून यात 4 लाख कामगार काम करतात. कोरोनामुळे सर्वच कंपन्या बंद असून,उत्पादन सुरू नसल्याने कामगारांना वेतन देण्यास आम्ही असमर्थ असल्याचे अनेक कंपन्यांच्या व्यवस्थापणाने स्पष्ट केले आहे.

corona-hit-by-economic-downturn-industrial-sector
कोरोनामुळे औद्योगिक क्षेत्राला आर्थिक मंदीचा फटका
author img

By

Published : Apr 15, 2020, 2:29 PM IST

नाशिक - कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला असून याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. नाशिकमध्ये औद्योगिक क्षेत्रात लहान मोठ्या वेगवेगळ्या 3 हजार कंपन्या असून यात 4 लाख कामगार काम करतात. कोरोनामुळे सर्वच कंपन्या बंद असून,उत्पादन सुरू नसल्याने कामगारांना वेतन देण्यास आम्ही असमर्थ असल्याचे अनेक कंपन्यांच्या व्यवस्थापणाने स्पष्ट केले असून औद्योगिक क्षेत्राचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सरकारला मदत करण्याची विनंती केली आहे.

corona-hit-by-economic-downturn-industrial-sector
कोरोनामुळे औद्योगिक क्षेत्राला आर्थिक मंदीचा फटका
मुख्यमंत्र्यांनी उद्योजक संघटनेनं दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की सरकार म्हणते वेतन द्या "पण नो वर्क नो पेमेंट" आज सरकारचा कायदा आहे तरी देखील माणुसकीच्या भूमिकेतून वेतन दिले जात आहे. आणखी काही दिवस ते देता येईल. मात्र कारखाने बंद ठेवणे कोणालाही परवडणारे नाही. एप्रिलचे वेतन मे मध्ये देण्यासाठी पैसे कुठून आणायचे ? असा प्रश्न उद्योजक उपस्थित करत आहे.

त्यामुळे वेतन न मिळाल्याने चार लाखाहून अधिक कामगार रस्त्यावर उतरण्यास ते कोणाला परवडणारे नसेल. त्यामुळे सरकारने या गोष्टीचा पुनर्विचार करावा. लॉकडाऊनमध्ये फुड प्रोसेसिंग, मेडिकल, बेकरी प्रॉडक्टचे शंभर-दीडशे उद्योग सुरू आहेत. सामाजिक अंतर वैद्यकीय सुविधा व निर्जंतुकीकरण यासारखे उपाय योजले जात आहेत. त्याच्या नियमांना अधीन राहून जिल्ह्यातील इतर कारखान्यांनाही लागू करुन कंपन्या सुरू करण्यास परवानगी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.