ETV Bharat / state

Vegetable Rate In Nashik: गृहिणींचे बजेट कोलमडले; कोथिंबीर 100 रुपये जुडी, इतर पालेभाज्यांभावात 30 ते 40 टक्के वाढ - बाजारात मालाची आवक कमी

नाशिकमध्ये कोथिंबिरीच्या दराने आसमान गाठले आहे. बाजारात मालाची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम भाव वाढीवर झाला आहे. किरकोळ बाजारात जवळपास सर्वच पालेभाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशात कोथिंबीर शंभर रुपये जुडी झाली असून, इतरही पालेभाज्यांचे दर 35 ते 40 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींची डोकेदुखी वाढली आहे.

Vegetable Rate In Nashik
पालेभाज्यांभावात 30 ते 40 टक्के वाढ
author img

By

Published : Jun 23, 2023, 5:53 PM IST

माहिती देताना गृहिणी

नाशिक : नाशिकमध्ये मागील पंधरा दिवसापासून बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने, सर्वच भाज्यांचे भाव वाढले आहे. अशात 15 जून पासून शाळा सुरू झाल्या असून, मुलांना शाळेच्या डब्यात काय द्यावे असा प्रश्न आईना पडला आहे. दररोज लागणाऱ्या भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट देखील कोलमडले आहे. त्यामुळे महागड्या दराने पालेभाज्या खरेदी करण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. दोन महिन्यापूर्वी शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकावर नांगर फिरवला, तर काही शेतमाल फेकून दिला होता, भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी शेत मोकळे करून घेतले होते. त्याचा परिणाम आता मालाच्या आवकवर झाला आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागड्या दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.

कोथिंबीर 100 तर आद्रक 250 रुपये किलो : बाजारात कोथिंबीरचे दर 100 रुपये जुडीवर पोहचले आहे. तर अद्रकाच्या भावाने उसळी घेतली असल्याने, सर्वसामान्यांना आल्याचा चहा आता फिका वाटू लागला आहे. बाजारात आद्रक 250 रुपये किलो दराने विकले जात आहे. त्यामुळे आता 70 रुपये पाव किलो दराने अद्रक घ्यावी लागत आहे.

Vegetable Rate In Nashik
पालेभाज्यांचे दर

बाजारात आवक कमी : मागील दीड महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांची बिकट अवस्था होती. टोमॅटोला दोन ते तीन रुपये किलो भाव मिळत असल्याने, बाजारात घेऊन जाण्यासाठीचा वाहतूक खर्च देखील परवडत नव्हता. तेव्हा अक्षरशः शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले होते. अशीच परिस्थिती सर्वच भाज्यांची होती. आता खूप कमी शेतकऱ्यांकडे भाजीपाला शिल्लक आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी झाली आहे, परिणामी भाव वाढले आहे. आज कुठे शेतकऱ्याला दोन पैसे मिळत आहेत असे, किरकोळ भाजी विक्रेते गोविंद गायके यांनी सांगितले.

बजेट कोलमडले : गेल्या पंधरा दिवसापासून भाजीपाल्यांचे भाव वाढले आहे. कोथिंबीर शंभर रुपये जोडी तर टोमॅटो देखील 70 ते 80 रुपये किलोने खरेदी करावे लागत आहे. इतर भाजीपाला देखील 30 ते 40 टक्क्यांनी वाढला आहे. आता आठवड्याला भाजीपाला खरेदी करते वेळी प्रत्येक वेळेस दोनशे ते तीनशे रुपये जादा मोजावे लागतात. त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडले असल्याचे गृहिणी सीमा पोडक यांनी सांगितले.

आजचे भाजीपाल्याचे भाव : अद्रक 250 रुपये किलो, कोथिंबीर 100 रुपये जुडी, टोमॅटो 70 ते 80 रुपये किलो, काकडी 50 रुपये किलो, वांगी 80 रुपये किलो, दोडके 80 रुपये किलो, गिलके 80 रुपये किलो, भेंडी 70 रुपये किलो, भोपळा 30 रुपये, शिमला 80 रुपये किलो, मिरची 120 रुपये किलो, मेथी 50 रुपये जुडी, शेपू 40 रुपये जुडी, पालक 30 रुपये जुडी, कोबी 20 रुपये गड्डा, फ्लावर 30रुपये गड्डा इतके दर आहेत.

हेही वाचा -

  1. Todays Petrol Diesel Rates काय आहेत आजचे पेट्रोल डिझेलचे दर वाचा सोने चांदी भाजीपाला आणि क्रिप्टोकरन्सीचे दर
  2. Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा 780 गावांना फटका, 65 हजार शेतकऱ्यांचे नुकसान
  3. Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये वाढले 'या' भाज्यांचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.