ETV Bharat / state

नाशिकमध्ये टँकरने दूषित पाणीपुरवठा; शासनाकडून नागरिकांची चेष्टा

भीषण दुष्काळामुळे सुरगाणा गावातील नागरिकांना पाण्याच्या एका हंड्यासाठी दिवसभर पायपीट करावी लागत आहे. तर दुसरीकडे शासन टँकरद्वारे दिले जाणारे पाणीसुध्दा दूषित असेल तर ही ग्रामस्थांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची भावना नागरिकांनी केली आहे.

नाशिकमध्ये टँकरने दूषित पाणीपुरवठा
author img

By

Published : Jun 7, 2019, 5:23 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात शासनाकडून टँकरने दूषित पाणीपुरवठा होत आहे. शासनाने आदिवासी नागरिकांची चेष्टा केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत नागरिकांनी पंचायत समितीतील अधिकाऱ्यांनी याबाबत जाब विचारला असता, अधिकाऱ्यांनी संबधितांची विचरणा करून माहिती दिली जाईल असे ढोबळ आश्वासन दिले.

नाशिकमध्ये टँकरने दूषित पाणीपुरवठा

नाशिक जिल्ह्यातीत सुरगाणा तालुक्यातील ५८ गावात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. या भागात शासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.मात्र, हे पाणी दुषित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुरगाणा गावातील आदिवासी बांधवांनी हे दुषित पाणी बाटलीत भरून सुरगाणा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दाखवले. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने पाणी पुरवठा करण्याचे काम दिलेल्या ठेकेदाराला याबाबत विचारणा करून माहिती दिली जाईल, असे ढोबळ आश्वासन दिल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

भीषण दुष्काळामुळे सुरगाणा गावातील नागरिकांना पाण्याच्या एका हंड्यासाठी दिवसभर पायपीट करावी लागत आहे. तर दुसरीकडे शासन टँकरद्वारे दिले जाणारे पाणीसुध्दा दूषित असेल तर ही ग्रामस्थांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची भावना नागरिकांनी केली आहे.

जून महिना सुरू असून, अद्याप पावसाचा पत्ता नाही. नाशिकच्या १५ तालुक्यापैकी ९ तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असून गावातील तलाव, विहिरी, नाले कोरडीठाक पडली आहेत. पाण्याच्या शोधासाठी नागरिकांना दिवसभर पायपीट करावी लागत आहे. शासनाकडून हजारो गाव-वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही तर दुसरीकडे टँकरने मिळणारे पाणीसुद्धा दूषित मिळत आहे. त्यामुळे शासनाकडून नागरिकांची चेष्टा तर होत आहे, शिवाय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही उपस्थित होत आहे. दूषित पाणीपुरवठा करण्याऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहे.

Intro:आदिवासी नागरिकांची शासनाकडून चेष्टा..टँकर द्वारे दूषित पाण्याचा पुरवठा...

Body:आदिवासी नागरिकांची शासनाकडून चेष्टा होत असल्याचे चित्र सुरगाणा गावात दिसून आलं..शासनाकडून टँकर द्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी सुरगाणा पंचायत समितीतील अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचाराल..

नाशिक जिल्ह्यातीत सुरगाणा तालुक्यातील 58 गावात भीषण पाणी टंचाई असून येथे शासना कडून टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जातो,मात्र टॅंकरने मिळणारे पाणी हे दूषित असून आज सुरगाणा गावातील आदिवासी बांधवांनी सुरगाणा पंचायत समितीतीत जाऊन दूषित पाण्याच्या बाटल्या दाखवून
अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचाराल..पाणी पुरवठा करण्याचे काम दिलेल्या ठेकेदाराला ह्याबाबत विचारणा करून माहिती दिली जाईल असं ढोबळ आश्वासन पंचायत समितीनं दिल्याचे ग्रामस्थानी सांगितलं...
भीषण दुष्काळ मुळे सुरगाणा गावातील नागरिकांना पाण्याच्या एका हंड्यासाठी दिवसभर पायपिट करावी लागतेय..तर दुसरी कडे शासन टॅंकर द्वारे दिले जाणारे पाणी सुध्दा दूषित असेल तर ही ग्रामस्थांच्या जखमेवर मीठ चोळ्ण्या सारख असल्याची भावना नागरिकांची झाली आहे...
नाशिक जिल्ह्यात जून महिना सुरू होऊन सुद्धा पाऊस पडेल अशी चिन्हे दिसत नाही..नाशिकच्या 15 तालुक्या पैकी 9 तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असून गावातील तलाव,विहिरी,नाले कोरडी ठाक पडली आहे..पाण्याच्या शोध साठी नागरिकांनी दिवस भर पायपीट करावी लागत आहे..शासना कडून हजारो गावा वाड्यांवर टॅंकर द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे..मात्र मुबलक प्रमाणात पाणी मिळतं नसतांना दुसरी कडे टॅंकर ने मिळणार पाणी सुद्धा दूषित मिळतं असेल तर ही ग्रामस्थांची चेष्टाचं होत असल्याची भावना नागरिकांची झाली आहे..दूषित पाणी पुरवठा करण्याऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहे ..
टीप फीड ftp
nsk dushit pani viu

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.