ETV Bharat / state

आयुक्त दीपक पांडेय यांची ग्रीन ज्युस संकल्पना उपयुक्त - छगन भुजबळ - concept of green juice of deepak pandey

पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या ग्रीन ज्युस या संकल्पनेचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कौतुक केले आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुक्तांनी स्वत: बेलपत्र, तुळस, कोथिंबीर, पालक यांचे प्रत्येकी पाच ते दहा पाने, दोन आवळे तसेच मीठ यांचे मिक्सरमध्ये मिश्रण तयार करत ज्यूस तयार केला आहे.

concept of green juice of deepak pandey
नाशिक ग्रीन ज्यूस संकल्पना
author img

By

Published : Nov 21, 2020, 6:04 PM IST

नाशिक - पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी ग्रीन ज्युस ही संकल्पना आणली आहे. जानेवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुक्तांनी स्वत: बेलपत्र, तुळस, कोथिंबीर, पालक यांची प्रत्येकी पाच ते दहा पाने, दोन आवळे तसेच मीठ यांचे मिक्सरमध्ये मिश्रण तयार करत ज्यूस तयार केला आहे. हा ग्रीन ज्युस रोजच्या आहारात घ्यावा, असे म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस आयुक्तांच्या ग्रीन ज्युस संकल्पनेचे कौतुक केले आहे.

यशस्वी संकल्पना

नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमी या ठिकाणी नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत कोविडोत्तर व्यवस्थापन प्रबोधन शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कोरोना काळात 'ग्रीन ज्युस' ही संकल्पना किती यशस्वी झाली ह्याबाबत पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लीना बनसोड यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

पालकमंत्री भुजबळांकडून पोलीस आयुक्तांच्या ग्रीन ज्युस संकल्पनेचे कौतुक
आयुक्त नॅचरोपॅथी अभ्यासक
नाशिकच्या पोलीस कोविड सेंटरमधून 198 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे नॅचरोपॅथी अभ्यासक देखील आहेत आणि याचा उपयोग पोलीस दलाच्या सुरक्षेसाठी करत आहेत. आर्थर रोड कारागृहासह राज्यातील कारागृहात आणि पोलीस सेंटरमध्ये ग्रीन ज्युस ही संकल्पना प्रभावीपणे राबवली आणि याचा फायदा बंदिवानांसह पोलिसांना देखील झाला आहे.
काय आहे ग्रीन ज्युस?
एका व्यक्तीसाठी आवळा 2 नग, पालक 10 पाने, कोथिंबीर 10 कांड्या, पुदिना 10 पाने, बेलपत्र 5 नग, कढीपत्ता 5 पाने सुरुवातीला चवीनुसार भाजलेले जिरे,सेंधव मीठ, लिंबूरस हे पदार्थ एकत्र मिक्सरमध्ये बारीक करुन ग्रीन ज्युस तयार करता येतो.

हेही वाचा - 'नितीन राऊत यांनी ऊर्जामंत्रिपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्क म्हणून काम करावं'
वयोवृद्ध व्यक्तींनी ग्रीन ज्युस अधिक फायदेशीर
बऱ्याच वयोवृद्ध व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे आजार जडलेले असतात. आता कोरोनाकाळात प्रत्येकाने प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. या काळात आरोग्यवर्धक ग्रीन ज्युस नक्कीच उपयुक्त ठरत असून मीदेखील मागील तीन दिवसांपासून तो घेत असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा - अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या तरुणांनी कुत्र्याला जिवंत जाळले! प्राणीमित्रांकडून कठोर कारवाईची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.