ETV Bharat / state

मनमाडचा पाणी प्रश्न ऐरणीवर, नगरपालिका मुख्याधिकाऱ्याच्या चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - लोकप्रतिनिधी

मनमाडला तब्बल २३ दिवसापासून पाणी नसून आता मनमाडचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

गरपालिका मुख्याधिकाऱ्याच्या चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
author img

By

Published : May 28, 2019, 8:04 AM IST

नाशिक - जिल्ह्यातील मनमाडला तब्बल २३ दिवसापासून पाणी नसून आता मनमाडचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

गरपालिका मुख्याधिकाऱ्याच्या चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

या बैठकीला मनमाडचे लोकप्रतिनिधी, नागरिक, जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मनमाडचे पाणी संपेपर्यंत नगरपालिका गप्प का राहिली ? मुख्य अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती का कळलेली नाही ?असा सवाल उपस्थित करत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दहा दिवस स्थानिक पातळीवर नियोजन करून मनमाडकरांना पाणी मिळणार आहे. त्यानंतर २ जूनपर्यंत पाणी आवर्तन मिळणार असल्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. मनमाडकरांवर ही वेळ प्रशासनामुळेच आल्याचा आरोप मनमाडकरांकडून करण्यात येत आहे. शहरात पाण्याची अतिशय बिकट परिस्थिती असून पाणी विकत देखील मिळत नाही. त्यामुळे मनमाड शहराचे लोकप्रतिनिधी व दिंडोरी लोकसभेचे खासदार भारती पवार आणि नांदगाव मतदार संघाचे आमदार पंकज भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे मनमाडकरांवर ही वेळ आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

Intro:नाशिक जिल्ह्यातील मनमाडला तब्बल 23 दिवसापासून पाणी नसून आता मनमाडचा पाणी प्रश्न ऐरणीवर आलाय.. आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज तातडीची बैठक आयोजन करण्यात आलं होत

Body:या बैठकीला मनमाडचे लोकप्रतिनिधी नागरिक जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते मनमाडचे पाणी संपेपर्यंत नगरपालिका गप्प का राहिली ? मुख्य अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती का कळलेली नाही ?असा सवाल उपस्थित करत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत

Conclusion:दहा दिवस स्थानिक पातळीवर नियोजन करून मनमाडकरांना पाणी मिळणार असून त्यानंतर दोन जून पर्यंत पाणी आवर्तन मिळणार असल्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय मनमाड करांवर ही वेळ प्रश्नांमुळेच आल्याचा आरोप मनमाड इतरांकडून करण्यात येतो आहे मनमाड शहरात पाण्याची अतिशय बिकट परिस्थिती असून पाणी विकत देखील मिळत नाही त्यामुळे आज मनमाड शहराचे लोकप्रतिनिधी व दिंडोरी लोकसभेचे खासदार भारती पवार आणि नांदगाव मतदार संघाचे आमदार पंकज भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे मनमाड करांवर ही वेळ आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलय..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.