ETV Bharat / state

Nashik CNG Rate: नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात वाढ, सीएनजी चार रुपयांनी महागला

सीएनजीच्या दरात वाढ सुरूच आहे. नाशिकमध्ये (CNG Price Has Increased In Nashik) सीएनजी आता आणखी महाग झाला आहे. नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात (CNG rate) प्रति किलो मागे चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे.या दरवाढीमुळे आता नाशिककरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

Nashik CNG Rate
नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात वाढ
author img

By

Published : Aug 4, 2022, 12:17 PM IST

Updated : Aug 4, 2022, 12:26 PM IST

नाशिक - एकीकडे जीवनावश्यक वस्तूच्या दरात सातत्याने वाढ होत असताना,आता सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलोमागे तब्बल 4 रुपयांनी दरवाढ ( CNG Price Has Increased In Nashik ) झाली आहे, सीएनजी गॅसचे प्रति किलो 91.90 रुपये भाव होते,मध्यरात्रीपासून त्यात 4 रुपयांनी वाढ केल्याने हे दर 95.90 रुपयांवर जाऊन पोहोचल्याने वाहनधारकांना दहा किलोमागे 40 रुपये ज्यादा मोजावे लागत आहे,हे वाढीव दर बघता सद्यस्थितीत पेट्रोल डिझेल आणि सीएनजीच्या दरात अवघी दहा ते पंधरा रुपयाची तफावत आहे.

सातत्याने होते वाढ - नाशिकमध्ये मध्यरात्री पासून सीएनजी गॅस 4 रुपयांनी ( Nashik CNG Rate )महागला आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना प्रति किलो साठी 96 रुपये मोजावे लागणार आहे. पेट्रोल,डिझेल आणि सीएनजी गॅसच्या दारात केवळ 10 ते 15 रुपयांची तफावत राहिली असल्याने वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त होते आहे. नाशिकमध्ये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सीएनजीचे दर प्रति किलो 71 रुपये एवढे होते, मे महिन्याच्या अखेरीस 10 रुपयांनी तर जून महिन्यात 4 रुपयांनी वाढ झाली होती,आता आता पुन्हा चार रुपयांना वाढ झाल्याने हे भाव 96 रुपये प्रति किलो पर्यंत जाऊन पोहोचले.

वाहनधारकांमध्ये नाराजी
एकीकडे पेट्रोल, डिझेलला पर्याय म्हणून केंद्र सरकार ( Central Govt ) सीएनजी वाहन खरेदी करण्यासाठी जनजागृती करत आहे. पेट्रोल डिझेल पेक्षा कमी दरात सीएनजी गॅस उपलब्ध असल्याने अनेक ग्राहकांनी सीएनजी वाहन घेतली मात्र या सीएनजी गॅसच्या भावात सातत्याने वाढ होत असून ती सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी नाही. तसेच नाशिक शहरात सीएनजी पंप ( Nashik City CNG Pumps ) हे मोजकेच असल्याने येथे गॅस भरण्यासाठी जास्त वेळ खर्च होतो. त्यामुळे व्यवसाय करून रोज कसा भरून काढायचा असा प्रश्न सीएनजी रिक्षा चालकांने उपस्थित केला आहे. एकीकडे ग्राहकांच्या कल पेट्रोल,डिझेल पेक्षा सीएनजी कडे वाढत असताना, सीएनजीचा मुबलक पुरवठा होत नसल्याने तसेच सातत्याने किंमतीत वाढ होत असल्याने याचा फटका ग्राहकांसह पंप चालकांनाही बसणार आहे.

हेही वाचा : Nashik Cyber Crime : चक्क! महापालिका आयुक्तांच्या नावाने फेक अकाऊंट; पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Last Updated : Aug 4, 2022, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.